पुरुष जेल कक्षात काम चालते पुरवठा विभागाचे, मन विचलीत होते सर्वसामान्य जनतेचे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२१
पाचोरा तहसील कार्यालयाची भव्य इमारत उभी असून या इमारतीमध्ये सर्व शासकीय कामे व्यवस्थित सुरू असतात. परंतु या कार्यालयाचे दुसऱ्या मजल्यावर आजच्या परिस्थितीत ज्या ठिकाणी ज्या खोलीमध्ये पुरवठा विभागाचे रेशन कार्ड बनवणे, जुन्या रेशन कार्ड च्या तक्रारींचे निवारण करणे व इतर कामे केली जातात. याकरिता तालुक्यातील सर्वसामान्य जनता अनेक समस्या सोडवण्यासाठी पुरवठा विभागाकडे धाव घेतात असे करत असताना खेड्यातील गरजूंना विशेष करून महिलांना या समस्या कोठे सोडाव्यात हे माहीत नसते म्हणून असे लोक पुरवठा विभागाचे रेशन कार्ड बनवायचे आहे असे विचारून संबंधित कार्यालय कोठे आहे असे विचारतात परंतु वरच्या मजल्यावर जा असेच सांगितल्याप्रमाणे तिथे गेल्यावर त्याठिकाणी पुरवठा विभागाचा रेशन कार्ड बनवून देणे घेणे किंवा इतर कोणताही सूचनाफलक नसल्याने या गरजूंची धावपळ होते नेमके या रेशन कार्ड चे कामकाज या खोलीत चालते त्याच्या खोलीवर पुरुष असे लिहिलेले आहे विशेष म्हणजे जेल हा शब्द ऐकण्यात किंवा वाचण्यात आल्यावर सर्वसामान्यांच्या अंगावर सहज शहारे येतात मग असाच सूचनाफलक लावलेल्या खोलीत थोडक्यात कार्यालयात