जळगाव आरटीओ कार्यालयाचा व्हिजीलंस पथकाने घेतला ताबा. कुछ तो गडबड है.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०९/२०२१
जळगाव येथे आज सकाळीच जळगाव उप प्रादेशिक कार्यालयाचा ताबा व्हिजीलंस पथकाणे ताबा घेतल्याचे माहीत पडताच कार्यालयात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्यालयात कुणालाही प्रवेश दिला जात नसून कार्यालयीन चौकशी कसून सुरु आहे. नेमके कोणते पथक आले असून काय कारवाई व चौकशी सुरु आहे याबद्दल निश्चित माहिती अद्याप बाहेर आलेली नाही.
आलेल्या पथकाने कार्यालयाचा ताबा घेतल्यामुळे सरकारी कामासाठी बाहेरगावाहून व शहरातील आलेल्या वाहनधाकरकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. या कार्यालयात व कार्यालयाच्या बाहेर नेहमीच दलालांचा विळखा पडलेला असतो. विशेष म्हणजे ऑनलाईन कामे होत असल्याचा देखावा केला जात असला तरी दलालांच्या माध्यमातूनच कामे कशी होतील या दृष्टीकोनातून वाहनधारकांना त्रास दिला जातो असे कळते कारण संबंधित कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच आर्थिक फायद्यासाठी काही पंटर पाळले असल्याचे देखील म्हटले जाते. कारण लाचलुचपत विभाग व इतर भितीमुळे ते या पंटरांच्या माध्यमातून आपला हेतू साध्य करुन घेतात असेही बोलले जाते.
व्हिजीलंस पथकाने अचानक कार्यालयाचा ताबा घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.