अवैध वृक्षतोडी विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची कारवाई, पाचोरा वनविभागाची मात्र वीरप्पनच्या पिल्लावळ सोबत दिलजमाई.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०३/२०२२
जळगाव जिल्ह्यासह पाचोरा तालुक्यात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून या वृक्षतोडीमुळे दररोज हजारो हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात असल्याने निसर्गप्रेमींनी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून वृक्षतोड त्वरित थांबवण्यासाठी निसर्गप्रेमीं लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत.
या वृक्षतोडीमागचे मागचे कारण म्हणजे वनविभागाची व विरप्पनच्या पिल्लावळीची अर्थपूर्ण गट्टी जमली असून यात लाकुड वखारींच्या मालकांचा ही सिंहांचा वाटा असल्याने लाकुड वखारीवर दररोज किती ट्रॅक्टर मोजले जातात त्याप्रमाणे प्रत्येक ट्रॅक्टर करीता ठरलेली रक्कम लाकुड व्यापाऱ्यांकडून वखार मालक हे लाकडाची किंमत देतांना कापून घेतात व नंतर इमानेइतबारे तो पैसा वनविभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला जात असल्याने ही भक्कम साखळी निर्माण झाली असल्याने वनविभागाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी या अवैध वृक्षतोडीमुळे मुद्दामहून कानाडोळा करत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.
मात्र दुसरीकडे पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी अवैधधंदे बंद करण्यासाठी कंबर कसली असून याकरिता काल दिनांक २ मार्च बुधवार रोजी रात्री ०९ वाजून ३० वाजेच्या सुमारास पिंपळगांव (हरे.) पोलिस स्टेशन हद्दीत पट्रोलिंग करीत असतांना राजूरी गावाचे फाट्याजवळ धरणालगत वरखेडी गावाकडून भोजे गावाकडे जातांना, वृक्ष तोड झालेले लाकडांनी भरलेला ट्रॅक्टर आढळून आला असता, ते ट्रॅक्टर थांबवून त्यावरील चालक नामे कडूबा रूपचंद पाटील, वय ३४ वर्षे काम ड्रायव्हर राहणार भोजे तालुका पाचोरा यांस त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर व त्यातील वृक्ष तोड झालेल्या लाकडांबाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे देत असल्याने, त्यांस त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरसह पिंपळगांव (हरे.) पोलिस स्टेशनला नेवून वृक्ष तोड झालेल्या लाकडांसह ट्रॅक्टर हे पोलिस स्टेशनचे आवारात आणून मा.स.पो.निरीक्षक सोो यांनी अटकावून ठेवलेल्या सदर वृक्ष तोड झालेल्या लाकडांचे ट्रॅक्टरचा सविस्तर वाहन पंचनामा करण्यात आला आहे,
यात १,५०,०००.०० रू.कि.चे एक स्वराज ७४४ FE कंपनीचे ट्रॅक्टर त्याचा धूळ क्र. MH-१९-BG-२३३२, निळ्या रंगाचे व ट्रॉली क्र. MH-१९-AN-८८५३ निळ्या रंगाचे, त्यावर प्रशांत ट्रेलर म्हसावद नांव असलेले, सदर ट्रॉलीत लिंब व बेहडा वृक्षाचे तोड झालेले खोड, लाकडांसह जप्त करण्यात आले असून सदर ट्रॅक्टर वाहनावरील चालक नामे कडूबा रूपचंद पाटील, वय ३४ वर्ष काम ड्रायव्हर राह.भोजे, ता.पाचोरा (मो.नं. ९५४५८१२९०१) यांस त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात दिले असून या अवैध वृक्षतोड विरोधात रितसर पुढील कारवाई होण्यासाठी मा.वन अधिकारी पाचोरा यांच्याकडे
पिंपळगांव (हरे.) पोलिस स्टेशनला, नोंद करुन कारवाई होणेबाबतचा रिपोर्ट पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे पो.हे. कॉ. ११६ या.श्री. संजय एकनाथ गायकवाड, नेम. पिंपळगांव (हरे.) पो.स्टेशन यांनी वनविभागाकडे सुपुर्द केला असल्याचे खात्रीलायक समजते.
तर दुसरीकडे या लाकूड व्यापाऱ्याला व ट्रॅक्टर मालकाला वाचवण्यासाठी रथी, महारथी धावपळ करत असल्याचे खात्रीलायक वृत्त असून लाकूड व्यापारी व त्यांचे हितचिंतक खिशात हात घालून पाचोरा वनविभाग कार्यालयाचे उंबरठे झिजवतांना दिसून येत असून या जप्त करण्यात आलेल्या लाकडाची मागील तारखेची वृक्ष तोडीची परवानगी धैण्यासाठी धडपड करत असल्याचे चर्चीले जात आहे.
वनविभाग फक्त नावालाच उरला असल्याचे दिसून येत आहे.