वरखेडी येथे रानभाज्या महोत्सव साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०८/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे दिनांक १२ ऑगस्ट गुरुवारी रानभाज्या मोहत्सव साजरा करण्यात आला. या रानभाज्या महोत्सवाचा शुभारंभ माजी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री.दिपकसिंग राजपूत, वरखेडी येथील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती पाचोरा, सरपंच सौ.अलकाताई विसपुते, डॉ.धनराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव मा.श्री.धनराज विसपुते. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला.
या रानभाज्या महोत्सवात श्री एम.बी.मोरे,मंडळ कृषी अधिकारी,पिंपळगांव, श्री. सुनिल पाटील,कृषि पर्यवेक्षक,पिंपळगांव,श्री. के.एफ.पाटील,कृषि पर्यवेक्षक,पिंपळगांव,श्री. सचिन भैरव,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा,ताललुका सर्व चमू, श्री. निलेश पाटील,संदिप चौधरी,ललित देवरे,चेतन बागुल,डी.डी.पाटील व श्रीमती स्नेहल पटवर्धन आणि विद्यादेवी पानपाटील हे कृषि सहाय्यक,यांनी अथक परिश्रम घेतले.