सेंट्रींग अपघातात जबर जखमी झालेल्या रुग्णाला वृंदावन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले जीवनदान.
सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०३/०३/२०२२
भडगाव तालुक्यातील कनाशी येथील रहिवाशी गोरख शिवाजी वाघ वय ३० हा अत्यंत गरिबीची परिस्तिथी असल्याने हा तरुण युवक गावात काम धंदा नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथे सेंट्रींग काम करण्यासाठी गेला होता. या कामावर सेट्रींग काम करत असतांनाच दिनांक १ मार्च २०२२ मंगळवार रोजी अचानक तोल गेल्याने हा तरुण कॉलमच्या खड्यात पडला.
खड्यात पडल्यामुळे झालेल्या अपघातात त्याचा उजव्या बाजूच्या खांद्यापासून निखळून तो निसटला होता. म्हणून त्याच्या सहकारी मित्रांनी तातडीने चंदनपुरी येथून थेट पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल गाठले, वृंदावन हॉस्पिटल येथील अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. नीलकंठ पाटील यांनी रुग्णाला तपासले, रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहता डॉक्टरांनी हॉस्पिटलला लागू असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत लाभ मिळवून देत उपचार केले.
रुग्ण हॉस्पिटल मध्ये आल्याबरोबर केवळ ३० मिनिटात रुग्णांचा खांद्याच्या संद्यातून निसटलेला हात बसवून रुग्णाला वेदना मुक्त केले. डॉक्टरांची ही तत्परता व महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल जखमी गोरख वाघ यांनी वृंदावन हॉस्पिटल संचालक व अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नीलकंठ पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.