सोयगावच्या व्यवसायिकाचे लोहारी जवळ मोटारसायकलला कार आडवी लाऊन ५०,३०० रुपये लुटले.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२२
सोयगाव येथील व्यवसायीक दिनांक ०४ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार रोजी पाचोरा येथून मोटारसायकलने आपल्या गावी जात असतांना लोहारी गावाजवळील इंदिरानगर जवळ भररस्त्यावर रात्री ०८.१५ चे सुमारास अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलला कार आडवी लाऊन मारहाण करत व्यवसायिकाजवळील बॅग हिसकावून चोरट्यांनी पाचोरा शहराकडे फळ काढला या रस्तालुटीत दागिने व रोख असे एकूण ५०,३०० रुपयांचा ऐवज त्यांनी लांबवला आहे. या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांन विरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धरमसिंग विजयसिंग राजपुत (वय ३८ धंदा कटलरी दुकान राहणार पळाशी ता. सोयगाव जि औरंगाबाद हमु जामनेर डाँम्ली प्लाँट भुसावळ रोड जामनेर, जळगाव) यांचे जामनेर गावात वैष्णवी लेडीज टेलर व तेथेच कटलरी दुकान आहे. दिनांक ०४/०२/२०२२ रोजी दुपारी ०४.१५ वाजता धरमसिंग विजयसिंग राजपुत हे मोठा मुलगा प्रेम सोबत मोटारसायकल क्रमांक एम. एच. २० ६६३७ ने गावी पळाशी (ता सोयगाव) येथे जाण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांच्याजवळ निळ्या रंगाची लहान हँन्डबँग होती.
त्यामध्ये ९४००/ – रू रोख सोन्याची गव्हाल्या मण्याची १३ ग्रँमची पोत होती. सदरचे पैसे धरमसिंग विजयसिंग राजपुत यांना भावना दिदी रा- भंगीवाडा जामनेर यांनी ३०० रू रोख दिले होते व सुनंदा पाटील गिरजा कलणी जामनेर यांनी पाटनर मध्ये माल भरण्यासाठी १५०००/-रू दिले होते तसेस सागर सुरेश पाटील रा धनपुष्प काँलणी जामनेर यांना उसनवार दिलेले २९०००/-रू असे एकूण ४४३००/- रू मिळाले होते. त्यापैकी धरमसिंग विजयसिंग राजपुत यांच्या पत्नीची महावीर ज्वेलर्स जामनेर येथे 8ग्रँम सोन्याची पोत १५९००/-रूपयावर गहाण ठेवले होती व त्यांना १५९००/रू रोख देवून सदरची पोत सोडवली होती.
तसेच शीतल ज्वेलर्स जामनेर यांच्याकडून ३ ग्रँमचे गव्हले मणी व २ ग्रँम सोन्याचे पेन्डल असे एकूण २५०००/-रूपयांचे सोने केले होते. त्यापैकी धरमसिंग विजयसिंग राजपुत यांनी शीतल ज्वेलर्स यांना १९०००/-रू रोख दिले होते त्यापैकी ६०००/-रू बाकी ठेवले होते. सदर सोन्याची पोत सोडवण्यासाठी व सोन्याचे मणी व पेन्डलचे पैसे धरमसिंग विजयसिंग राजपुत यांनी ४४३००/- रू यामधून दिले होते. 8ग्रँमची सोन्याची पोत, ३ ग्रँमचे सोन्याचे गव्हले मनी व २ ग्रँमचे सोन्याचे पेन्डल व रोख ९४००/-रू असे घेवून धरमसिंग विजयसिंग राजपुत हे पाचोरा मार्गे जारगाव चौफुली वरून पळाशी तालुका सोयगाव येथे जात होते.
धरमसिंग विजयसिंग राजपुत यांची मोटार सायकल रात्री २०.१५ वाजता लोहारी गावाजवळील इंदीरानगर जवळून जात असतांंना मोटार सायकलच्या मागून पांढर्या रंगाची स्विफ्ट डिझायर सारख्या वाहणाने मोटार सायकल आडवून थांबवली. कारमधून एक अनोळखी व्यक्ती उतरला. तो धरमसिंग विजयसिंग राजपुत यांना म्हणाला की मी तुला कधीचा शोधत आहे असे बोलून मोटार सायकलला लाथ मारून खाली पाडले.
त्यानंतर मोटार सायकलच्या हँन्डलला लटकवलेली निळ्या रंगाची बँग हिसकावून वेगाने त्यांच्या गाडीने पाचोऱ्याकडे पसार झाले. गाडी चालवणारा व मारहाण करून लुटमार करणारा असे दोघे जण होते. याप्रकरणी दोघा अनोळखींवर जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.