सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

क्राईम जगत
Home›क्राईम जगत›विवाहितेच्या खूनप्रकरणी ३ अटकेत आरोपी पतीसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

विवाहितेच्या खूनप्रकरणी ३ अटकेत आरोपी पतीसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

By Satyajeet News
February 6, 2022
1930
0
Share:
Post Views: 212
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०२/२०२२

सद्यस्थितीत सगळीकडे अराजकता माजली असून महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. यात बऱ्याचशा घटनांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार, विनयभंग, पळवून नेणे, सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या तर कुठे महिलांचे दिवसाढवळ्या खुन होत आहेत. तर काही घटनांमध्ये खुन करून कुठे अपघात तर कुठे आत्महत्या दाखवून घातपात झाकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ह्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कायदासुव्यवस्थेबद्दल शंका निर्माण होते. कारण कायद्याचा धाक राहिलेला नाही असेच म्हणावे लागेल. कारणही तसेच आहे. सद्यस्थितीत बऱ्यापैकी आरोपींना पाठीशी घालण्यासाठी रथी-महारथींंचा हस्तक्षेप, आपपल्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी धडपड व त्यातच काही प्रमाणात पोलिस विभागातील टंगळमंगळ कायद्यातील पळवाटा हे घातक मुद्दे आहेत. तसेच घटना घडल्यानंतर तपासकामी समाजातील व परिसरातील लोकांकडून सहकार्य, साक्षीपुरावे मिळत नसल्याने तपासाला योग्य गती मिळत नाही. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणून आरोपी निर्दोष सुटत असल्याकारणाने गुन्हेगारीत वाढ होत आहे.

अश्याच एका घटनेत पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा शिवारातील शेतात राहत्या घरातील पलंगावर मनीषा चेतन राठोड (२४) ही विवाहिता मृतावस्थेत आढळून आल्याने पाचोरा पोलिसात शुक्रवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु मयत विवाहितेच्या नातेवाईकांतर्फे सासरच्या मंडळी विरोधात संशय व्यक्त करण्यात आला होता. शव ताब्यात न घेता घटनेची पोलीस प्रशासनास चौकशीची मागणी करण्यात आली होती. मृतदेहाचा पंचनामा करून जळगाव हलविण्यात आले होते. शनिवार, ५ रोजी मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ पवार (३२) (रा. कुंदाने तांडा, जि.धुळे) यांनी पाचोरा पोलिसात मयत विवाहितेचा पतीसह चौघांविरोधात

खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ४ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी गाळण, विष्णुनगर भागातील नाचखेडा शिवारात असलेल्या शेतातील घरात आरोपी पती चेतन राठोड, छायाबाई राठोड, जयसिंग राठोड, भगवान राठोड (सर्व रा. गाळण, विष्णुनगर, ता.पाचोरा) यांनी मत मनीषा हिस क्रूझर गाडीचे हप्ते फेडण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये तसेच पती चेतन व जेठाणी यांचे अनैतिक संबंध असल्याचे मयत विवाहितेने पाहिल्याच्या कारणावरून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ करून गांजपाठ केला व जीवे ठार मारले, अशी फिर्याद मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्व पोलिसात दाखल केल्याने वरील सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती चेतन राठोड, जयसिंग राठोड, भगवान राठोड यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश चौबे करीत आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

सोयगावच्या व्यवसायिकाचे लोहारी जवळ मोटारसायकलला कार आडवी ...

Next Article

स्व. लता मंगेशकर यांच्या करीयरची सुरवात पाचोरा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedक्राईम जगत

    अंबे वडगाव गावा,तांड्यात खुलेआम सट्टा बिटींग (त्रस्त महिलांनी सत्यजीत न्यूज कडे मांडली कैफियत ) अवैधधंदे करणारांकडून आंदोलन कर्त्यांना दमदाटी

    November 20, 2020
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करुन खुन, जामनेर तालुका हादरला.

    June 12, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    कोल्हे येथील सासरच्या लोकांनी केला गिरड येथील जावायाच्या घरावर जीवघेणा हल्ला.

    January 12, 2024
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    दक्ष पत्रकार संघाचे राहुरीचे संपादक तसेच संस्थापक मा रोहिदास दातीर यांची हत्या.

    April 7, 2021
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    गुटखा किंग पाचोर्‍याचे त्रिमूर्ती, वितरण मात्र पिंपळगाव हरेश्वर येथील एका टेलरच्या व किराणा दुकानातून.

    August 6, 2022
    By Satyajeet News
  • क्राईम जगत

    घोगरगावात देशी व गावठी दारुचा पुर, कारवाईची मागणी.

    May 15, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • आरोग्य

    एका बाजूला उष्ण लहरीचा (हीटवेव) तडाखा, तर दुसरीकडे बेसुमार वृक्षतोड.

  • ब्रेकिंग न्यूज

    आजचे सर्व शासकीय कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उद्घाटनाचे कार्यक्रम रद्द. आ. किशोर आप्पा पाटील.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा पुरवठा विभागात दलालांचा उच्छाद व धान्य वाटपात घोळ. समाजसेवक मा.श्री.अरुण पवार यांची तक्रार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज