शहापुरा येथे घरात प्रवेश करुन, ४६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०७/२०२३
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोहारा येथून जवळच असलेल्या शहापुरा गावातील रहिवासी गणेश रुपचंद परदेशी यांच्या घरात अज्ञात व्यक्तीने अनाधिकृतपणे प्रवेश करुन ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८० ग्रॅम वजनाचे चांदिचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे हद्दीतील शहापुरा गावातील शेतकरी गणेश रुपचंद परदेशी हे दिनांक १८ जूलै २०२३ मंगळवार रोजी सकाळी घराला कडी लावून शेतात कामाला निघून गेले होते. याचाच फायदा घेत घरावर पाळत ठेवून अज्ञात व्यक्तीने गणेश रुपचंद परदेशी यांच्या घराची कडी उघडून घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन घरात असलेल्या पत्र्याच्या पेटीचा कडी, कोंडा वाकवून पेटीत असलेले ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ८० भार वजनाचे चांदिचे दागिने चोरुन नेल्याची घटना गणेश परदेशी व त्यांचे कुटुंबीय घरी आल्यावर उघडकीस आली आहे.
या चोरीच्या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर १८०/२०२३ भादवी कलम ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार हे करत असून घटनेची माहिती मिळताच पाचोराचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. धनंजय वेरुळे साहेबांनी घटनास्थळी भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्रजी वाघमारे यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत.
गणेश परदेशी यांच्या घरातील चोरी ही घरावर पाळत ठेवून करण्यात आली असल्याचा प्रथम अंदाज असल्याने ही चोरी कुणीतरी जवळच्या किंवा आसपासच्या व्यक्तीनेच केली असावी अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.