शेतकऱ्याच्या पोरांनो, कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांच्या, मोर्चात सहभागी होऊ नका. “संतोष पाटील”
दिनांक~२६/०१/२०२२
आपल्यावर झालेला अन्याय किंवा आपल्या हक्क मागण्यांसाठी संविधानिक मार्गानं लोकं एकत्र करून मोर्चा काढला जातो, आपल्यावरील अन्याय दूर करून न्याय मिळवून घेता येतो, शासनातील व प्रशासनातील लोकांना खडबडून जागे करण्यासाठी मोर्चाचे हत्यार योग्यच आहे मग तो कुठल्याही कारणासाठी असो ते हत्यार उपसायला हवं ,लोकांनी एकत्र येत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनदरबारी आपली न्याय्य बाजू लावून धरून न्याय मिळवून घेतला पाहिजे. दीनदुबळ्या वंचित शेतकऱ्यांचे प्रश्न नोकरदारांचे प्रश्न किंवा इतर नागरी सुविधांसाठी खेड्यापाड्यातील गरीब दुबळ्या जनतेसाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे ,मात्र तसं होताना दिसत नाही आणि त्या कारणांसाठी कोणीच मोर्चा काढत नाही ,तर मोर्चा का काढला जातोय हे आधी समजून घेतलं पाहिजे *आपल्या पक्षात आपल्या मतदार संघात व* *आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आपलं वर्चस्व कायम टिकून राहिले पाहिजे* म्हणून हे मोर्चे काढले जातात खरं म्हणजे या मोर्चेकऱ्यांना शेतकऱ्यांचे खरे प्रश्न माहीत नाहीत, काही मुठभर लाभार्थी कार्यकर्ते सोबत घेऊन हे लोक धिंगाणा घालण्याचा प्रयत्न करतात, मला मान्य आहे मोर्चा काढण्याचा, आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा, व न्याय मागण्याचा संविधानिक अधिकार सर्वांनाच आहे. पण आपण कशासाठी हे सारे करतोय हे कळलं पाहिजे, नुसत्या शेतकऱ्यांच्या नावाने सत्ता मिळवणारे रक्तपिपासू नेते राजकारणी लोक समाजामध्ये दुही माजवून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रोजी संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे माघाईचा राक्षस सर्वत्र चाल करून येत आहे, नित्य जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तीन पट दराने खरेदी करावे लागत आहेत सामान्य माणूस कसातरी आपलं जीवन जगत असताना त्याच्यासाठी कुठल्याच कल्याणकारी योजना आता कार्यान्वित दिसत नाहीत, असतील ही तर त्या आपल्या कार्यकर्त्यांमध्ये वाटल्या जातात व सामान्य माणूस तसाच आ वासून उभा असतो, सामान्य माणसापर्यंत कल्याणकारी योजना कधीच पोहोचत नाहीत आणि त्याच्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही आवाज उठवला जातो तो सत्तेसाठी, *जेव्हा आपले सरकार असतं* *तेव्हा सामान्य माणसांचे गरिबाचे शेतकऱ्यांचे प्रश्न साधे* *ऐकून घेतले जात नाहीत* जेव्हा सरकार पडतं आपल्याला विरोधी बाकावर बसावं लागतं तेव्हा त्यांना सामान्य माणूस गरीब दुबळा शेतकरी आठवतो ,आणि मग विद्यमान सरकारला कोंडीत धरण्यासाठी या गरिबांचं भांडवल करून ते लोक मोर्चाचे नियोजन करतात ,यामध्ये सहभागी होणारे 70 टक्के कपाळकरंटे शेतकऱ्याचे पोरं असतात त्यांना फक्त आपल्या नेत्यासाठी आपला जीवन कुर्बान करायचं असतं, बाप मातीत खापतोय कधी झाडावर लटकतोय याचं त्यांना सोयरसुतक नसतं ,अशा या अवलादी बापाच्या मरणाचं खरं कारण ठरत आहे, नेता फक्त खुर्ची टिकण्यासाठी सत्तेसाठी खोटं खोटं शेतकऱ्या बद्दल चे प्रेम दाखवत असतो खरं पाहिलं तर त्याला शेतकऱ्यांशी व त्यांच्या पोरांशी काहीच घेणंदेणं नसतं, पण ही शेतकऱ्यांची बावळट पोरं आपले कामधंदे सोडून बापाच्या मारेकऱ्यांच्या झेंडे खांद्यावर घेऊन मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहे, जर तुमची सदसद्विवेकबुद्धी जागृत असेल तर थोडा विचार करा अभ्यास करा आपले कुठे चुकत आहे मित्रहो माझी तळमळ समजून घ्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या मोर्चात सहभागी होऊ नका, हे आपल्या बापाचे मारेकरी आहेत इतकं लक्षात ठेवा अन्यथा आपला विनाश ठरलेला आहे.
संतोष पाटील
7666447112