प्रविण दरेकरांनी शेण खाल्लं’; पाचोऱ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/०९/२०२१
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका करतांना राष्ट्रवादीमधील महिलांच्या प्रवेशा बाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ‘गरीबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून दरेकरांच्या प्रतिमेला जोडे मारुन जाहीर निषेध करत आंदोलन करण्यात आले.
प्रविण दरेकर यांनी शिरूर इथे राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त जय मल्हार क्रांती संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उपस्थित असतांना हे वादग्रस्त वक्तव्य केलं. दरेकरांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतांना चाकणकर यांनी राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
पाचोरा-भडगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात दरेकरांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला जोडे,चपला मारुन निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सौ. वंदनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री. विकास पाटील सर तसेच शहरातील सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलनावेळी ‘प्रविण दरेकरांचा निषेध करून ‘दरेकरांचा धिक्कार असो.’, अशा घोषणा देण्यात आल्या.