गरुड महाविद्यालयाच्या रासेयो एकका तर्फे रक्तदान शिबिर संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२१
धी.शेंदूर्णी सेकं.एज्यु. को-ऑप सो.लि.शेंदूर्णी संचलित अप्पासाहेब र.भा.गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो एककाच्या व आचार्य प्रतिष्ठान शेंदूर्णीच्या वतीने कै.आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या स्मृती-प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन आ.ग.र.ग.प्राथमिक विद्यामंदिराच्या प्रांगणात करण्यात आले होते.
हे रक्तदान शिबीर संस्थेचे अध्यक्ष मा.दादासो संजयजी गरुड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उदघाटन संस्थेचे सचिव श्री. सतीशचंद्र काशीद व संस्थेच्या संचालिका सौ. उज्ज्वला ताई काशीद यांच्या प्रमुख उपस्थितीत, शेंदूर्णी नगरीच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमात प्राथमिक शाळेच्या राजश्री ओव्हाळ,तनिष्का सुर्यवंशी, मनीष पाटील,प्रतीक बोंडे, तनुश्री साळुंखे,श्रावण गरुड,अवनी दवंगे,अवनी चौधरी, भैरवी गरुड,सई मराठे या विद्यार्थ्यांनी कै. बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. या नंतर संस्थाध्यक्ष दादासो.संजय गरुड यांनी उपस्थितांना आचार्य बापूसाहेबांच्या तेजस्विता,तपस्वीता ह्या गुणांचा आढावा घेत गत स्मृतींची उजळनी केली.
तसेच आपल्या अध्यक्षिय मनोगतातून कै.बापूसाहेबांप्रती आपला कृतज्ञता भाव व्यक्त केला. शिबिरात उल्लेखनीय बाब म्हणजे कै. बापूसाहेबांच्या कन्या व संस्थेच्या संचालिका सौ.उज्ज्वलाताई काशीद यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदान करण्याची प्रेरणा उपस्थितांना दिली. या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालय शासकीय रक्तपेढी जळगाव व रेड प्लस रक्तपेढी जळगाव यांनी सकाळी ९:०० ते दुपारी ०१:०० दरम्यान रक्तसंकलन केले. या रक्तदानशिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या शिबिरच्या उदघाटन प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक श्री.सगरमलजी जैन,संस्थेचे संचालक अभिजित काशीद,देवश्री काशीद,संस्थेचे सहसचिव भाऊसाहेब सो.दिपकजी गरुड,आचार्य प्रतिष्ठान अध्यक्ष व वसतिगृह सचिव श्री.कैलास देशमुख, श्री. अमृतबापू खलसे,श्री.शेरू काझी,श्री.शांतारामबापू गुजर,श्री.यु.यु.पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो सहाययक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.ए.एन.जिवरग,रासेयो महिला सहाययक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील, शिक्षक वृद श्री. एस.व्ही. काटे,श्री.पंकज चौधरी, श्री.एस.बी.गरुड,सेवक बाळू पाटील व सर्व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.ग.ग.प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. सौदामिनी गरुड यांनी तर सूत्रसंचालन श्री.अरुण राठोड व आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी व्यक्त केले.