प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०३/२०२१
भुसावळ राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना ‘जीवन गौरव पुरस्कार २०२१-२१’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या ऊपस्थितीत त्यांच्या जन्मगावी कळमसरे येथे करण्यात येईल.
प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी हे पी.के.कोटेचा महिला महाविद्यालयातील वाणिज्य शाखेमधील सेवानिवु्त्त प्राध्यापक आहेत. त्यांनी उपप्राचार्य व प्रभारी प्राचार्य पदाची देखील जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. त्यांचे शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. ते सदैव हसतमुख व ऊल्हासीत,कार्यतत्पर व्यक्तीमत्व असुन, सतत गरज, होतकरू विद्यार्थी, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी तसेच गरजुंना शक्य ती मदत करीत आहेत. ते भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाउपाध्यक्ष आहेत. त्यांनी कपूरचंद कोटेचा स्मु्ती व्याख्यानमालेच्या सलग १६ वर्ष आयोजनात मुख्य भूमिका बजावली. ते भुसावळ येथील जैन सोशल गु्पचे माजी सल्लागार आहेत. कोटेचा महाविद्यालयीन कर्मचारी पतसंस्थेचे ते संस्थापक व अध्यक्ष होते!त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, वाचनालयांना पुस्तके व इतर साहित्य भेट दिले. तर अनेक गो शाळांना, व्रुध्दाश्रमांना, सामाजीक संस्थांना आर्थिक मदत देत आहेत.
प्रा.डॉ.ललवाणी यांच्या आईचे व मुलाचे अल्पवयात निधन झाले. त्यामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी या दु:खातूनही स्वत:ला आणि कुटुंबालाही सावरले. ते पुन्हा समाजासाठी प्रेरणादायी कार्य करीत आहेत. संकटातील अनेकांना मदतीचा हात, खचलेल्यांना मानसिक आधारही देत आहेत. *
ते कळमसरा (ता.पाचोरा) येथील मूळ रहिवासी असून या परिसरातही ते समाजहिताच्या कार्यास मदत करीत असतात.अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून ते उच्चशिक्षित होऊन सामान्यपणे जीवनयापन करीत आहे. त्यांच्यावर अनेक वेळा संकटे आली, तरी ते न डगमगता ध्यैर्याने सामोरे गेले. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘ *जीवन गौरव* पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदिपा ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली.