बोगस डॉक्टर कडून चुकीच्या उपचार पध्दतीने मृत झालेल्या मुलीची किंमत, फक्त पासष्ट हजार रुपये. भाग ~ ५

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०८/२०२२
(आजच्या परिस्थितीत जनहितार्थ शोध पत्रकारिता करणे म्हणजे एक तारेवरची कसरत ठरत आहे. कारण सगळीकडेच भ्रष्टाचार, अत्याचार, हुकुमशाही, समाज विघातक काम करणारांचे संघटन, यांना मिळणारा राजाश्रय अश्या विविध बाबींमुळे कधी, कधी शोध पत्रकारिता करणाऱ्यांच्या जीवाशी खेळ होतो. कारण शोध पत्रकारिता म्हणजे कामचुकार, भ्रष्ठाचारी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. म्हणून अशा पत्रकारांवर खोटे गुन्हे, धमकी, हल्ले असे प्रकार घडतात परंतु हे लोकशाही करीता घातक ठरेल हे मात्र नक्की.)
पाचोरा तालुक्यात बोगस डॉक्टरकडून अल्पवयीन मुलीवर चुकीचे उपचार झाल्यामुळे प्रकृती चिंताजनक. भाग. २ या शीर्षकाखाली सत्यजित न्यूज कडून बातमी प्रकाशित करण्यात आली होती. परंतु सदर लहान मुलीवर बोगस डॉक्टरकडून करण्यात आलेल्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्या बालिकेचा मृत्यू झाल्याचे खात्रीलायक वृत्त सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाले आहे.
हा प्रकार येथेच थांबला नसून सदर मुलीचा अचानकपणे मृत्यू झाल्याने संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरकडे याबद्दल विचारणा केली असता संबंधित डॉक्टरने संबंधित कुटुंबाला हाकलून लावले कारण संबंधित मयत झालेल्या मुलीचा परिवार हा गरिब, हातमजुरी करणारा तसेच आदिवासी, निरक्षर, बाहेर गावचा रहिवासी आल्यामुळे त्यांना पाहिजे तसे सहकार्य मिळाले नसल्याने त्यांच्याकडे पर्याय नव्हता.
परंतु हे संबंधित कुटुंब मयत मुलीला घेऊन मुळ गावी गेल्यानंतर तेथील एका उच्च शिक्षीत डॉक्टरकडे बोगस डॉक्टरकडून देण्यात आलेली औषधी व मुलीचा मृतदेह दाखवला असता चुकीच्या औषधोपचारासाने मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर ते पीडित कुटुंब पुन्हा बोगस डॉक्टरकडे जाब विचारण्यासाठी आले असता संबंधित बोगस डॉक्टरणे काही लोकांच्या मध्यस्थीने मयत मुलीच्या कुटुंबीयांनी पासष्ट हजार रुपये देऊन प्रकरण थांबले असल्याची जोरदार चर्चा घटना घडलेल्या गाव परिसरातील जनतेतून ऐकावयास मिळते आहे.
महत्वाचे~
गावागावातून असे बरेचसे बोगस डॉक्टर आपले दवाखाने थाटून दिवसाढवळ्या रुग्णांच्या जिवाशी खेळ खेळत आहेत. याबाबत सुज्ञ नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून आजपर्यंत कुठेही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच या बोगस डॉक्टरांविषयी प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठवल्यावर सुद्धा जबाबदार अधिकारी व आरोग्य विभाग कोणती ठोस कारवाई करत नसल्याने असे गंभीर प्रकार घडत आहेत. परंतु असे गंभीर प्रकार घडल्यानंतर ज्या, त्या गावातील सरपंच पोलीस पाटील व जबाबदार पदाधिकाऱ्यांनी या बाबींकडे लक्ष देऊन तक्रार करून गुन्हा नोंद केला पाहिजे, परंतु सर्वसामान्य नागरिकांनी बद्दल कोणाला काही देणे घेणे नसून ‘ज्याच जळत, त्यालाच कळत’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
म्हणून आता तरी मा. जिल्हाधिकारी, मा. जिल्हा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी गाव निहाय बोगस डॉक्टरांचा सर्वे करू त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व त्यांची नावे जनहितार्थ जाहीर करावी म्हणजे अशा बोगस डॉक्टरांकडे कोणीही उपचार घेण्यासाठी जाणार नाही अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवली आहे.