लोहारा गावात भारतीय लष्कर प्रमुख केप्टन.विपीन रावत यांच्यासह ११ शहीद जवानांना श्रद्धांजली.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांकत्य~१२/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारा गावात तामिळनाडू मध्ये हेलिकॉप्टर अपघातात शहीद झालेले विपीन रावत व त्यांच्या पत्नी तसेच ११ वीर जवानांना आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी गावातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्ते तिरुपती म्युझिक सिस्टीमचे संचालक राजू चौधरी,लोहारा यांनी देशभक्तीपर गाणे वाजवून देशभक्ती संगीतांच्या माध्यमातून आदरांजली वाहिली.
तर गावातील सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संघटना यांचे कार्यकर्ते, तसेच गावात सुट्टी निमित्ताने आलेले सैनिक नितीन क्षीरसागर, चंद्रकांत गीते,भिका जाधव,शंकर खाटीक,जगदीश तेली या जवानांच्या हस्ते प्रथम प्रतिमेला आदरांजली वाहण्यात आली. तसेच सुभाष मिलेट्रीमॅन यांची देखील उपस्थित होती, तसेच उद्योजक, सर्व पत्रकार सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित होते.
या वेळी लोहारा विद्यालयातील पुरुषोत्तम सुर्वे सर, सामाजिक कार्यकर्ते गुणवंत क्षीरसागर,व हेमंत गणेश गुरव यांनी सदर विषयाची सविस्तर मांडणी केली. सदर श्रद्धांजली कार्यक्रमाला रामराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष नथ्थु कोळी, बजरंग दल शाखा संयोजक महेंद्र दिलीप घोंगडे,मयूर मासाळ, दिनेश पांडव,सतिष चौधरी,सचिन कुंभार,समाधान कोळी,राहुल माळी,वाल्मिक कोळी,गणेश गीते, माणुसकी समूहाचे गजानन क्षीरसागर हे उपस्थित होते यानंतर हेमंत गणेश गुरव यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.