आर्वे गावात कुत्र्यांचा उपद्रव, ग्रामस्थ व लहान बालकांचा जीव धोक्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील लोहारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आर्वे गावात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून या कुत्र्यांना काही दिवसापूर्वी त्वचा रोगाची लागण झाली आहे. या व्याधीने हे कुत्रे पिसाळल्यासारखे करत असल्याने ग्रामस्थ व मुलांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
यामागील कारण म्हणजे या कुत्र्यांना त्वचाविकार या लागण झाल्यापासून ते अंग गाजवतात यामुळे अंगावर जखमा झाल्या आहेत. या जखमांवर माशा बसून त्रास देत असल्यामुळे माशांच्या त्रासापासून वाचण्यासाठी हे कुत्रे घराच्या आडोशाला वा अंधारात घुसण्याचा प्रयत्न करत थेट घरात घुसत आहेत. यांना कुणी हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धाऊन येतात व चावा घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच दैनंदिन कामासाठी गल्ली बोळातून फिरतांना हे कुत्रे अंगावर धावून येत असल्याने गल्लीबोळातून फिरणे मुश्कील झाले असून या कुत्र्यांपासून लहान मुलांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून घराबाहेर निघणे मुश्कील झाले आहे.
या कुत्र्यांच्या त्रास हा उपद्रवामुळे एखाद्यावेळेस मोठा अनर्थ होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात असून या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आरवे गावातील ग्रामस्थ व महिलावर्गाकडून होत आहे.