राज्य सरकार शेतकर्यांच्या पाठीशी : ना. गुलाबराव पाटील

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२०
शेतकर्यांच्या मालास योग्य भाव मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. ते चिंचोली येथे दिनांक ३० नोव्हेंबर सोमवार रोजी मका खरेदीस शुभारंभ करतांना बोलत होते.
जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत मका खरेदी शुभारंभ करण्यात आला. तालुक्यातील चिंचोली येथील गोदामाजवळ या केंद्राचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा शैलजाताई निकम तर प्रमुख अतिथी म्हणून जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन संजू पाटील, संचालक रामनाथ पाटील, वाल्मिक पाटील, रमेश पाटील, शांताराम सोनवणे, वसंत साबळे, अनिरुद्ध जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ना. पाटील यांच्या हस्ते मका खरेदीस प्रारंभ झाल्यानंतर ते म्हणाले की, राज्य शासन हे शेतकर्यांच्या मदतीसाठी कटीबध्द असून शेती मालास योग्य भाव मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ना. पाटील म्हणाले.