सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›पाचोरा-भडगावात अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शासकीय धान्य खरेदीस सुरवात.

पाचोरा-भडगावात अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे शासकीय धान्य खरेदीस सुरवात.

By Satyajeet News
June 24, 2021
222
0
Share:
Post Views: 33
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०६/२०२१

पाचोरा आणि भडगाव तालुक्यात शासकीय धान्य खरेदीस प्रारंभ करण्यात आला असून या संदर्भात भाजप तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोल शिंदे यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुमारे दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड, जळगाव यांच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकरी सहकारी संघामार्फत शेतकर्‍यांचे ज्वारी, मका व गहू खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांकडून नोंदणी केली गेली होती. ज्वारी, मका व गहुसाठी पाचोरा – भडगाव तालुका मिळून ३ हजार ५०० शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती.

मात्र प्रत्यक्षात खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाले होते. खरिपाचा हंगाम येऊन गेला परंतु शेतकरी बांधवाचा रब्बीचा शेतमाल घरात पडून होता. त्यामुळे आर्थिक नियोजन करणे त्यांना जिकिरीचे झाले असतांना काही शेतकरी बांधवांनी भाजपा तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोल शिंदे यांची भेट घेऊन ही समस्या मांडली.

यावर तात्काळ मार्ग निघावा यासाठी मा.श्री. अमोल शिंदे यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांना दि. १० मे २०२१ रोजी भेट घेऊन पाचोरा – भडगाव सह जिल्ह्यातील शासकीय धान्य खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावी यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली होती. तसेच खा. उन्मेष पाटील यांनी देखील सहकार व पणन विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांशी बोलून यावर तात्काळ शेतकर्‍यांना दिलासा द्यावा अशा सूचना देखील केल्या होत्या.

दरम्यान, अमोल शिंदे यांच्या पाठपुराव्याला प्रत्यक्षात यश आले आणि धान्य खरेदीचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले. परंतु आदेश प्राप्त होऊन देखील प्रत्यक्षात खरेदी करण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याने खरेदी होऊ शकत नव्हती. त्यामुळे तेवढ्यावर न थांबता मा.श्री. अमोल शिंदे यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी समन्वय साधून तो देखील विषय मार्गी लावला. यामुळे दि. २२ जून पासून शासकीय धान्य खरेदीला सुरुवात झाली त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष मा.श्री. अमोल शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी २५ जून पासून आमदार ...

Next Article

बिलवाडी ,ता.जामनेर येथील चर्मकार समाजातील मतिमंद अल्पवयीन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वीरप्पनच्या पिल्लावळीला आलाय माज, वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाताला खाज. दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल सुरुच.

    April 17, 2024
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन फिरणारे आता सत्तेत मशगुल (खासदार उन्मेश दादा पाटील) केळी फळ पिक विमा निकष विरोधात जळगाव येथील ९ ...

    November 6, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    भारत बंदला जाहीर पाठिंबा

    December 8, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोऱ्यात गो. से. हायस्कूलच्या कलाशिक्षकांची अनोखी जनजागृती

    November 8, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    नदीच्या पुरात वाहून मृत्यू पावलेल्या तरुणाच्या वारसाला ४ लाखांच्या धनादेशाचे वाटप आ.किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

    October 6, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीतर्फे पोलीस निरीक्षक मा.श्री. किसनराव पाटील यांचा सत्कार

    November 12, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • क्रिडा क्षेत्र.

    अमोलभाऊ शिंदे शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात, खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला उद्घाटन सोहळा.

  • शुभेच्छा जाहिरात

    समाजकारण, राजकारणाची आवड सोबतच वकिली व्यवसायातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे दिपक पाटील.

  • कृषी विषयक

    राज्यकर्त्यांनो हरामी पणा करू नका ज्यांच्या मुळे देशाचा जी. डी. पी. सावरला जातो त्यांच्या डीपीच कनेक्शन तोडू नका. संतोष पाटील.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज