शिंदाड येथे २ सप्टेंबर गुरुवार रोजी भव्य मोफत रोगनिदान शिबिर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०८/२०२१०
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील मा.श्री. संदीप बोरसे (स्पर्श फोटो)चे संचालक यांचे वाढदिवसानिमित्त तसेच विघ्नहर्ता मल्टी हॉस्पिटल पाचोरा व शिंदाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे भव्य रोगनिदान शिबीर दिनांक २ सप्टेंबर २०२१ गुरुवार रोजी सकाळी ०८ वाजे पासून ते दुपारी ०२ वाजेपर्यंत उपकेंद्र शिंदाड येथे ठेवण्यात आले आहे. या शिबिरात विध्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर मा.श्री. भुषण दादा मगर व मा.श्री. सागर दादा गरुड यांच्या मार्फत सर्वप्रकारचे आजाराची मोफत तपासणी करुन मोफत उपचार करण्यात येणार आहे. तसेच ई.सी.जी. ब्लड प्रेशर, रक्तातील साखरेचे प्रमाण याची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
तसेच नियमानुसार महात्मा जोतिबा फुले योजनेत टेस्ट अॅन्जीग्राफी व अॅन्जीओप्लास्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करण्यात येईल.
या मोफत रोगनिदान व मोफत उपचार शिबीरासाठी शिंदाड डॉक्टर असोसिएशन, आई मेडिकल, धन्वंतरी मेडिकल, श्रीकृष्ण मेडिकल, वरद मेडिकल, श्रीराम सोनार, लहुजी वस्ताद, राजपूत मित्र मंडळ, ओम साई फाऊंडेशन, छत्रपती ग्रुप,सिध्देश्वर मित्र मंडळ व सर्व शिंदाड ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्य लाभणार असून या शिबिरात येऊन जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.