कुऱ्हाड येथे उद्या कुस्त्यांची भव्य दंगल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२१
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथे तब्बल दोन वर्षाच्या कालखंडानंतर कुस्त्यांच्या विराट दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही कुस्त्यांची दंगल भारतीय जनता पार्टी शाखा कुऱ्हाड व कुऱ्हाड ग्रामस्थांच्या सहकार्याने व आयोजित करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारिमुळे कुऱ्हाड येथे कुस्त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. कुऱ्हाड नगरी ही कुस्त्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. कारण या गावात आज पर्यंत अनेक मल्ल घडले आहेत. कुस्ती क्षेत्रात अनेक पहिलंवानांनी महाराष्ट्रभर आखाडे गाजवलेले आहेत. तर काही मल्ल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्ती खेळून आलेले आहेत. हीच परंपरा कायम टिकावी व तरुणांमध्ये व्यायाम, कुस्त्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून उद्या दिनांक ०५ डिसेंबर रविवार रोजी सकाळी १२ ते सायंकाळी ०५ वाजे दरम्यान कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कुस्ती स्पर्धेचे आखाडा पूजन जामनेर मतदार संघाचे आमदार गिरीशभाऊ महाजन करणार असून, त्यांचे सोबत प्रमुख पाहुणे म्हणून भा.ज.पाचे पाचोरा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ. भूषण दादा मगर, मा.पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर सोनार, पंचायत समिती सदस्य पती कैलास चौधरी, संजय शांताराम पाटील, मा.जी.प.सदस्य संतोष चौधरी, गण प्रमुख जगदीश तेली व आयोजक पिंटू पैलवान, सोनू पैलवान तसेच कुऱ्हाड ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार आहे.
तरी पंचक्रोशीतील जनतेने कोरोणा नियमांचे पालन करून या कुस्ती स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.