पाचोऱ्यात श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान १५ फेब्रुवारी पर्यंत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२१
पाचोरा शहरात व तालुक्यामध्ये राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशी संकल्पना हाती घेऊन श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथे होणाऱ्या श्री राम मंदिर यासाठी देशातील विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच बजरंग दल च्या माध्यमातून श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये आपल्या सोयीने नागरिक आपल्या परीने निधी देत असून पाचोरा शहरामध्ये प्रतिष्ठीत तसेच राजकीय व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे यामध्ये शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून ५१ हजार रुपये
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश बापू शिंदे यांच्या तर्फे ५१ हजार रुपये.
त्याचबरोबर भाजपाचे तालुकाध्यक्ष व युवा नेते अमोल शिंदे यांच्या माध्यमातून ७५ हजार रुपये.
तर पाचोरा तील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांकडून आप आपल्या परीने निधी देण्यात येत आहे यासाठी अभियान प्रमुख महावीर गौड, संघचालक दिनेश अग्रवाल, वाघ, राजू बाळदकर मनिष काबरा सुनील सराफ दीपक पाटील संतोष मोरे आदींचे सहकार्य लाभले आहे