राजकीय जोडे बाहेर काढून पाचोरा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी रंगले कोल्हे येथील कुस्तीच्या आखाड्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०८/२०२२
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही मरीमात देवीचा यत्रा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कोल्हे येथील ग्रामस्थांनी भव्य कुस्तीच्या दंगलीचे आयोजन केले होते. यानिमित्ताने पाचोरा तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. सद्यस्थितीत राजकीय आखाड्यात एकमेकांच्या विरोधात चाललेल राजकारण पहाता सर्वसामान्य जनतेला खुपच अडणीच झाल आहे. परंतु काल पाचोरा तालुक्यातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी दाखवून दिलं की राजकारण हे फक्त वेळेपुरत असत नंतर सगळे मतभेद विसरुन समाजात वावरणे गरजेचे आहे.
असेच काहीसा अनुभव काल कोल्हे येथील कुस्तीच्या आखाड्यात दिसून आला या वेळी कुस्तीचा आखाडा पुजन व मल्लाच्या कुस्त्या लावण्यासाठी पाचोरा तालुक्याचे विद्यमान आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील, माजी आमदार मा. दिलीप भाऊ वाघ, माजी जिल्हापरिषद सदस्य मा. श्री. उध्दवभाऊ मराठे, विद्यमान जिल्हापरिषद सदस्य मा. मधुकर भाऊ काटे, मा. श्री. सचिन दादा सोमवंशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुणभाऊ पाटील, कोल्हे गावचे प्रतिष्ठित नागरिक मा. श्री. रमेशचंद्रजी बाफना हजर होते.
(कृपया संपूर्ण व्हिडिओ बघा)
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले. नंतर कोल्हे ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुस्त्यांच्या दंगलीला सुरवात करण्यात आली. याप्रसंगी पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. आर. के. पाटील, मा. श्री. राकेश खोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला