भोकरी येथील अलनूर फाउंडेशन आयोजित प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पार्धांचा ज्ञानेश्वर सोनार यांच्या हस्ते शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२३
पाचोरा तालुक्यातील भोकरी येथे अलनूर फाउंडेशन तर्फे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य मा. श्री. ज्ञानेश्वर भाऊ सोनार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक मा. श्री. ज्ञानेश्वर सोनार यांनी प्रथम चांगल्याप्रकारे फलंदाजी करत खेळाडूंची मने जिंकून घेतली.
या अलनूर फाउंडेशन तर्फे आयोजित प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी भोकरी गावचे सरपंच मौलाना अरमान, वरखेडीचे सरपंच मा. श्री. चंदुभाऊ पाटील, भोकरीचे उपसरपंच जलील रफीक भाई, माजी उपसरपंच अस्लम कहाकर, ग्रामपंचायत सदस्य नबीजी अब्दुल कहाकर, अफसर कहाकर, अफसर कहाकर, मा. श्री. राजुभाऊ विठ्ठल चौधरी, डॉ. अशपाक अस्लम कय्युम, सादिक, सईद कहाकर, मुस्ताक खंबीर, आसिफ कय्युम व वरखेडी, भोकरी गावांसह आसपासच्या गावातील खेळाडू व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.