मा. अमोलभ भाऊ शिंदे चषक अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/१२/२०२२

पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्थेतर्फे दिनांक ३१ डिसेंबर २०२२ शनिवार ते २ जानेवारी २०२३ सोमवार दरम्यान “अमोल भाऊ शिंदे चषक” अंतर्गत विविध विविध शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा शिंदे इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य पटांगणावर होणार आहेत.

अमोल भाऊ शिंदे चषक अंतर्गत गट ‘अ’ मध्ये १४ वर्ष आतील मुला, मुलींसाठी बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, त्वायकांदो, टेबल टेनिस व आर्चरी (धनुर्विद्या) च्या स्पर्धा होतील. तर गट ‘ब’ मध्ये १७ वर्ष आतील मुला, मुलींसाठी खो, खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, व मॅट वरील कबड्डी व कुस्ती या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शाळांसाठी मर्यादित या स्पर्धा असून स्पर्धेतील सहभागी खेळाडू व संघांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला स्पोर्ट टी-शर्ट व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२२ शनिवार रोजी सकाळी ०९ वाजता स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा होईल. व ०२ जानेवारी २०२३ सोमवार रोजी दुपारनंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण होणार आहे.

पाचोरा भडगाव तालुक्यातील २३५५ शालेय क्रीडापटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी व या क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष पंडितराव शिंदे , संस्थेचे सचिव ऍड. जे. डी. काटकर, उपाध्यक्ष नीरजभाई जैन, सहसचिव प्रा. शिवाजी शिंदे तसेच शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या