मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत चाळीसगावात १६ रोजी विविध कार्यक्रम.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/११/२०२१
चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यात चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे स्व.उदेसिंग अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण व चाळीसगावात अपंग दिव्यांग व परीतक्त्या महिलांना साहित्याचे वाटप, मंगळवार १६ रोजी करण्यात येणार आहे. दरम्यान, वरखेडे येथे सहकार महर्षी स्व.उदेसिंग अण्णा पवार यांच्या पुतळ्याचे सर्वोदय शिक्षण प्रसारक संस्थेच्या प्रांगणात अनावरण करण्यात येणार आहे.
(मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत कार्यक्रम)
मंगळवारी दुपारी दोन वाजता चाळीसगावात मंत्री बच्चू कडू यांचे आगमन होईल तर दुपारी २ ते २.३० वाजेपर्यंत स्वागत समारंभ होऊन तीन वाजता पुतळा अनावरण कार्यक्रमाला ते हजेरी लावतील. यानंतर ४.३० वाजता चाळीसगावात दिव्यांग व परित्याक्त यांच्यासाठी गरजू साहित्याचे वाटप होणार आहे.
या कार्यक्रमानंतर चाळीसगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आरोग्यदूत वर्धमान धाडीवाल यांच्या कार्यालयास नामदार बच्चू कडू भेट देतील. यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश असलेल्या जागेचे दर्शन ते घेतील आणि श्री. संत संताजी महाराज पुतळ्यास माल्यार्पण करून औरंगाबादकडे प्रयाण करतील. या संपूर्ण कार्यक्रमास नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन वर्धमानभाऊ धाडीवाल मित्र परीवारातर्फे करण्यात आले आहे.