सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जामनेर, पाचोरा रस्ते व रेल्वे प्रकल्पांना वेग; मात्र गावठाण, गायरान जमिनीवरील मुरुम उत्खननाची भीती वाढली

  • दुसऱ्यासाठी खड्डा खणला… आणि स्वत:च त्यात पडल्या! कुऱ्हाड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या जाकिराबी कहाकर अपात्र.

  • तपोवनातील हजारो वृक्षतोडीच्या प्रस्तावावर जिल्हाभरातून संताप, पाचोरा पत्रकार संघाचा प्रशासनाला ठणकावलेला इशारा.

  • अपंग दांपत्याची धावपळ व्यर्थ ? अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याच्या प्रकरणात पोलिसांचा दिरंगाईचा आरोप !

  • “शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला! पाचोर्‍यात अनुदान घोटाळा उघड, नाव तुमचं, आधार-खाते दुसऱ्याचं!”

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›*व्यथा शहीद जवानाची* शब्दांकन~ प्रशांत पाटील सर( शिंदाडकर)

*व्यथा शहीद जवानाची* शब्दांकन~ प्रशांत पाटील सर( शिंदाडकर)

By Satyajeet News
November 14, 2021
291
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

व्यथा शहीद जवानाची.

शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारासाठी सारा गाव, पंचक्रोशीतील लोक, आमदार , खासदार, शासकीय अधिकारी व नातेवाईक हजारोच्या संख्येनं उपस्थित होते. एका सजवलेल्या ट्रॅक्टर मधून शहीद जवानाच पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आलं. ऐन दिवाळीच्या दिवसात अशी दुःखद घटना घडल्यामुळे सारा गाव शोकसागरात उडून गेला होता.

शव पेटीच्या भोवताली शहीद जवानाचे आई वडील, बायको त्याची तीन वर्षाची मुलगी व साऱ्या नातेवाईकांनी गराडा घातला होता. आई वडील आपल्या मुलाला शेवटचा निरोप देणार होते.

खरंतर आपल्या डोळ्यादेखत आपल्या पोटचा गोळा आपल्याला सोडून जावा, यासारखं मोठे दुःख या जगात कोणतच नाही. बायको तर ओक्साबोक्शी रडत होती. अहो धनी उठाना. अहो माझ्यासाठी नाही पण आपल्या चिमुरड्या छकुली साठी तरी उठाना. आठ दिवसापूर्वी छकुलीला तुम्ही फोनवर सांगितलं होतं की बाळा दिवाळीला येताना, तुझ्यासाठी कपडे, खेळणे, मिठाई घेऊन येणार आहे. त्या दिवसापासून छकुली रोज मला विचारायची का ग आई आज येणार आहेत का पप्पा?

मी तिला सांगायची अगं वेडे दिवाळीच्या दोन-तीन दिवस अगोदर येतील तुझे पप्पा, तुम्ही दिवाळीत आलात खरं पण ते अशाप्रकारे याल अशी पुसटशी कल्पना देखील आम्ही केली नव्हती.
सारा परिसर अगदी शोक मय स्तब्ध झाला होता. शहीद जवानाच्या बायको व्यतिरिक्त कुठलाच आवाज येत नव्हता.
तेवढ्यात आवाज आला अगं वेडे रडू नकोस. तूच जर असा धीर सोडलास तर आई-बाबांनी काय करायचं. सारे चकित झाले. कारण हा आवाज शव पेटीतून येत होता.

आणि त्या शहीद जवानाच पार्थिव पुढे बोलू लागल. बाबांनो माझी ही अशी अंतयात्रा पाहून खरच मी भारावून गेलो. माझ्या कुटुंबाच्या सहानुभूती पोटी तुम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित झालात याची मला जाणीव आहे. आणि अशी सहानुभूती माझ्या कुटुंबाप्रती कायम असू द्यावी ही नम्र विनंती , कारण या अगोदरही अनेक जवान या मातृभूमीसाठी शहीद झाले आहेत. आणि त्यांच्या अंत्ययात्रेत सुद्धा अशीच तुफान गर्दी मी बघितली आहे.

पण ? नंतर ही सहानुभूती जाते तरी कुठे? कारण शहीद जवानाच्या अंत्यसंस्कारावेळी मोठ-मोठी भाषणे दिली जातात. मोठमोठ्या घोषणा केल्या जातात . पण? नंतर त्या शहीद जवानाच्या कुटुंबाकडे शासन ढुंकून पाहत ना आमदार खासदार ना इतर लोक आमचं कुटुंब वाऱ्यावर सोडलं जातं. म्हणून इथे उपस्थित सर्वांना मी विनंती करतो . की आता माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची सदैव व गरज आहे.

म्हणून माझ्या कुटुंबामागे खंबीरपणे उभे रहा. कारण आई बाबा आता म्हातारे झालेत. आणि माझ्या जाण्याने तर ते जास्तच खचुन जातील. बायकोनं तर घर सोडून अंगण पाहिलं नाही. आणि माझी छकुली तर अजून तीन वर्षांचीच आहे. तिचे ते बोबडे बोल अजूनही माझ्या कानात घुमत आहेत.

मला सारखं फोन करून सांगायची, पप्पा , दिवाळीला येतांना माझ्यासाठी कपडे, खेळणे, मिठाई आठवणीने घेऊन या, आणि या सर्व वस्तू मी खरेदी देखील केल्या होत्या. पण? नियतीने माझ्यासाठी पुढे काय लिहून ठेवलं होतं, याची मला कल्पना नव्हती. इथं उपस्थित माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की सणावाराला आमच्या घरी चक्कर मारत चला. तेवढच आई-बाबांना हलक वाटेल. माझ्या पश्चात माझ्या छकुलीला माझी उणीव भासू देऊ नका. आणि हो, माझ्या छकुलीच लग्न थाटामाटात करा. आणि मी आशा बाळगतो की तुम्ही सर्व माझ्या परिवाराच्या पाठीशी सदैव उभी रहाल. आणि हीच खरी श्रद्धांजली माझ्यासाठी असेल.

जय हिंद जय भारत

एकदम आवाज बंद झाला. हे सर्व ऐकून उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. त्यानंतर शहीद जवानाच्या प्रेताला अग्नीडाग दिला गेला. उपस्थित जवानांच्या तुकडीने देखील शहीद जवानाला आकाशात बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

लेखन: प्रशांत पाटील सर(शिंदाडकर) 9403301538

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 46
Previous Article

मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत चाळीसगावात १६ ...

Next Article

सावखेडा येथील मंगलसींग परदेशी यांच्यावर मंगळवारी सकाळी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    वेळीच काळजी घ्या, आज जिल्ह्यात आढळले ३९ कोरोनाबाधित.

    January 5, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पिंपळगाव हरेश्वर येथे २२ मार्च ते २४ मार्च पर्यंत जनता कर्फू.

    March 21, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा मतदार संघातील १९ साठवण बंधाऱ्यांच्या कामांसाठी सुमारे १७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी; आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश

    March 14, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगावआरोग्य

    पाचोरा शहरातील शासकीय दरात उपचार देणारे नवजीवन कोविड केअर सेंटर .

    March 5, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    आता तर अती झाले यापुढे सहन करणे शक्य नाही, क्षत्रिय गृप पाचोरा.

    December 7, 2022
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    कोळगावचे माजी सरपंच कै.सुकदेव सुपडू पाटील यांच्या घरी खासदार उन्मेश दादा पाटील यांची सांत्वन भेट.

    October 30, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • विविध यश निवड

    गरुड विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. बी. एम. कुमावत सरांना पदोन्नती व सत्कारासह निरोप.

  • Uncategorized

    औरंगाबाद जिल्ह्यात गारपीट शेतकरी हवालदिल.

  • धार्मिक

    मरी माता यात्रोत्सवा निमित्ताने कोल्हे येथे आज जंगी कुस्त्या व लोकनाट्य तमाशाचे आयोजन.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज