उठ ओबीसी जागा हो, एकतेचा धागा हो.पाचोर्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपाचे चक्काजाम आंदोलन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०६/२०२१
पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून शनिवारी सकाळी ११ वाजता जारगाव चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला.राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षणासह आता ओबीसी आरक्षण सुद्धा गेले असून आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षणाचा फायदा घेता येणार नाही.
महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात वारंवार सूचना करून देखील या निष्क्रिय सरकारने इम्पेरियल डाटा न दिल्याने ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्यात आले, तसेच हे सरकार जाणीवपूर्वक हे सर्व घडवून आणत असून या मागचा नेमका उद्देश काय? असा सवाल उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला तसेच यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आणि जवळपास तासभर जारगाव चौफुली येथे आंदोलकांनी बसून सर्व वाहतूक थांबवून ठेवली होती. त्यामुळे जवळपास एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.
त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करत पोलीस वाहनात बसून पाचोरा पोलीस स्टेशन ला नेऊन वाहतूक सुरळीत केली.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे,विधानसभा क्षेत्र प्रमुख हिंमतसिंह निकुंभ, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन,शहराध्यक्ष रमेश वाणी,सरचिटणीस गोविंद शेलार,संजय पाटील,दीपक माने,राजेश संचेती,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष गोविंद पाटील,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष गोविंद देवरे,भाजपा उपाध्यक्ष प्रमोद सोमवंशी,महेश पाटील,किरण पांडे,शरद पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील,शहराध्यक्ष समाधान मुळे,शांतीलाल तेली,नामदेव भावडू पाटील,मुस्लिमशेठ बागवान,तालुका चिटणीस किरण पाटील,प्रदीप पाटील,पदमसिंग परदेशी,हेमंत चव्हाण,जगदीश पाटील,योगेश ठाकूर,कुमार खेडकर,लकी पाटील,विरेंद्र चौधरी,जगदीश पाटील,मनोज पाटील,शुभम पाटील,रवींद्र देशमुख,संजय आढाव,सारंग पवार,विजय पाटील,रवींद्र पाटील,प्रकाश पाटील,दीपक, प्रवीण पाटील,भरत जिभाऊ सईद मिस्तरी,जगदीश राठोड,राजु देवरे,हेमंत पाटीलआदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच या आंदोलन प्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.श्री. किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मा.श्री. गणेश चौबे, मा.श्री. दत्तात्रय नलवाडे, मा.श्री. विकास पाटील, पोलिस कॉन्स्टेबल मा.श्री. प्रकाश पाटील, योगेश पाटील, नितीन सुर्यवंशी, सुनील पाटील, सचिन पाटील, अमृत पाटील, मनोज माळी, विश्वनाथ देशमुख, निलेश गायकवाड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, सुनील पाटील, वाहतूक विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल बापु महाजन, नंदकुमार जगताप, विजय पाटील, नगर परिषद कर्मचारी अनिल वाघ, प्रशांत कंडारे, प्रकाश लहासे तसेच होमगार्ड पथकाने चोख बंदोबस्त ठेवला होता.