तारखेडा येथील शेतकऱ्याचा विहीरीत बुडून मृत्यू !
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील ४८ वर्षीय इसमाचा विहीरीत बुडुन मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील सुखदेव हिलाल पाटील (वय – ४८) हे आज सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. दुपारी ते पाणी घ्यायला नजीकच्या शेतातील विहिर असलेल्या ठिकाणी गेले. मात्र विहीरीतून पाणी काढत असतांना त्यांचा तोल जावुन ते विहीरीत पडले. त्यातच पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे.
दरम्यान ते पाणी घेऊन परतले नसल्याने घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेत असतांनाच धना अहिरे यांच्या शेतातील विहीरी जवळ सुखदेव पाटील यांचे बुट दिसून आले. त्यावर विहीरीत शोध घेण्यात आले असता सुखदेव पाटील यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान सुखदेव पाटील यांचा मृतदेह ग्रामीण महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदन झाल्यावर वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना सुर्यकांत नाईक हे करीत असून मयताच्या पाश्चात्य पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.