सावखेड्याचे सुपुत्र शहीद मंगलसिंग परदेशी यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.जिल्हा पोलिसदलकडून २१ तोफांची सलामी,१०वर्षाच्या चिमुकल्याने दिला वीर पित्याला अग्निडाग.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२१
पठाणकोट येथे भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सावखेड्याचे सुपुत्र शहिद मंगलसिंग जयसिंग परदेशी नायक वय ३५ यांचेवर काल दुपारी १२ वाजता भैरवनाथ मंदिराच्या परिसरातील अमरधाम येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलिस दलाच्या पथकाने तोफांची सलामी देत शहीद मंगलसिंग परदेशी यांचा १० वर्षाचा चिमुकला मुलगा चंदन परदेशी याने विरपित्याला अग्निडाग दिला.यावेळी शहिद मंगलसिंग परदेशी यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी वीरमाता मीराबाई परदेशी, वडील जयसिंग परदेशी,वीर जवानाची पत्नी किरण परदेशी,मुलगा चंदन परदेशी,मुली चंचल व हर्षदा, भाऊ ईश्वर परदेशी, अनिल परदेशी, आ किशोर पाटील,प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल,उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे,जिल्हा सैनिक अधिकारी,अनुराध वाकडे गटविकास अधिकारी अतुल पाटील नायब तहसीलदार संभाजी पाटील,सहा पोलिस निरीक्षक कृष्णा भोये,सहा पो निरीक्षक राहुल मोरे ,जी प सदस्य मधुकर काटे, रावसाहेब पाटील ,दिपकसिंग राजपूत ,भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, डॉ.भूषण मगर,पं.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी,सावखेडा बु || च्या सरपंच सुमनबाई वाघ,राष्ट्रवादी च्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी,तलाठी संदीप चव्हाण,ग्रामसेविका शेलार मॅडम,उपसरपंच राजेश सोनवणे,सरपंच सावखेडा खु || च्या दिपमाला परदेशी, पोलीस पाटील संजय परदेशी,यांचेसह पाचोरा तालुक्यातील व पंचक्रोशीतील सुमारे १० हजारावर जा समुदाय शहीद जवानाच्या अंत्यसंस्कार प्रसंगी उपस्थित होते.
तत्पूर्वी मंगळवारी सकाळी ९ वाजता शहिद मंगलसिंग परदेशी यांचे पार्थिव पठाणकोट हुन विमानाने औरंगाबाद येथे ३९ इ.एम.इ.बटालियन चे हवालदार अमर माने यांनी आणले.मुंबई येथून आ.किशोर पाटील यांच्या खाजगी ॲंबुलन्सने सावखेडा येथे पार्थिव आणण्यात आले.यावेळी सावखेडा गावात प्रत्येक अंगणात शहिद जवान प्रति रांगोळ्या काढून गावात तिरंगे ध्वज लावून बॅनर व फुलांनी ठिक ठिकाणी सजावट करून गाव सजवले होते.वीर जवानासाठी गावापासून ३ किमी पर्यंत रांगोळ्या काढून वरखेडी गावापासून देशभक्तीपर गीते म्हणत बँड पथकाने वीर जवानाच्या घरी ९.३० ला पार्थिव आणले.
नंतर अर्धातास घरी अंत्यदर्शनासाठी ठेवून वीर जवानाची अंत्ययात्रा सजवलेल्या ट्रॅक्टरवर गावातून मीरवणूक काढण्यात आली.यावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करून पुष्पांजली वाहिली याप्रसंगी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहत होता. ५०० फूट लांब तिरंगा घेत युवा वर्गाने देशभक्तीची साखळी केली होती.३ किमी पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या.गावात एकही चूल पेटली नव्हती.पार्थिवावर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले.यावेळी अंत्यसंस्कारासाठी सुमारे दहा हजारावर जनसमुदाय उपस्थित होत.मंगलसिंग अमर रहे,जय जवान जय किसान,भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ३९ इ. एम. इ. बटालियन पठाणकोट येथील नायक मंगलसिंग जयसिंग परदेशी यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सावखेडा बु || ता.पाचोरा येथील नायक पदावर असलेल्या जवानास अंतिम निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारोंच्या उपस्थिती.शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
येथिल जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी यांना हजारोंच्या उपस्थितीत आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.यावेळी जवानाचे पार्थिव वरखेडी बु || व वरखेडी खुर्द || येथून सावखेडा गावी नेत असतांना वरखेडी येथिल ग्रा.पं.चे सरपंच अलकाताई विसपुते सर्व ग्रां.पं.पदाधिकारी,ग्रामस्थ,महिला व तरूणांनी पार्थिव नेणा-या ॲंबुलन्सवर पुष्पवृष्टी करून दर्शन घेतले.यावेळी सर्वांचे अंत:करण गहिवरून आले होते.
त्यानंतर पार्थिव सावखेडा येथिल घरी आणल्यानंतर अंत्ययात्रा निघाली.यावेळी जमलेले हजारो माता भगीनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये वातावरण सुन्न झाले होते.आई-वडील,पत्नी,मुले,सर्व उपस्थित नातेवाईक टाहो फोडून रडत असल्याने अंत:करण हे लावणारे दृश्य निर्माण झाले होते.
पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार,आजी माजी जि.प.सदस्य,पंचायत समिती सदस्य तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदधिकारी,शासकिय अधिकारी,पंचक्रोशितील गावचे पदधिकारी,हिंदू मुस्लिम बांधव,पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.डी.जे.च्या देशभक्ती च्या गीतांनी प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणून वातावरण भावनिक,गर्भीत झालेले होते.
नियोजित स्थळी अंत्यसंस्कार करण्याआधी उपस्थित सर्व मान्यवरांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली तर जळगाव पोलिस दलाच्या तुकडीने तोफांची सलामी देत मानवंदना दिली.हजारोंच्या संखेने जनसमुदाय उपस्थित होता.मंगलसिंग यांच्या मुलाने अग्निडाग दिला.
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही यावेळी परिजनांची भेट घेतली