जळगाव जिल्ह्यामध्ये स्वराज्याची पहिली बैठक मोठ्या उत्साहात संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२२
आज जळगाव येथे श्रीमंत छत्रपती संभाजी राजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची बैठक अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव या ठिकाणी संपन्न झाली ही बैठक स्वराज्याचे प्रवक्ते करण गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून आशिष नाना हिरे दिनेश नरवडे उपस्थित होते यावेळी स्वराज्याचे प्रवक्ते करण गायकर यांनी उपस्थित स्वराज्याच्या शिलेदारांना स्वराज्य संघटने विषयी माहिती दिली स्वराज्य संघटनेचे ध्येयधोरण समजून सांगितले.
श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये स्वराज्य या संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झाली असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्याने ही पुढाकार घेतल्याने आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार स्वराज्य संघटना ही प्रस्थापित लोकांची नसून विस्थापित लोकांना प्रस्थापित करण्यासाठी आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळात छत्रपती संभाजी राजे महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत त्यावेळी जळगाव जिल्ह्यातही ते येणार आहेत म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे गाव तिथे स्वराज्य संघटन उभे राहिले पाहिजे प्रत्येक गाव निहाय स्वराज्याच्या वतीने राबविले गेलेले उपक्रम पोहोचविले पाहिजे त्या ठिकाणी त्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत स्वराज्याची माहिती कळविण्यासाठी आपण येणाऱ्या काळात काम करावे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
आज जळगाव जिल्हा स्वराज्याच्या निमंत्रक पदी सुनील देवरे पाटील भ्रमणध्वनी क्रमांक ९८९०८७५२३८ व मनोहर शिंदे भ्रमणध्वनी क्रमांक ९९२२२५४१५ यांची निवड करण्यात आलेली आहे* यावेळी मोठ्या संख्येने स्वराज्याचे शिलेदार उपस्थित होते.