वरखेडी येथील गुरांचा बाजार भरवण्यास परवानगी, उद्या गुरांचा बाजार नियमित सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१०/२०२१
लम्पी स्कीन या आजाराने डोके वर काढले होते याची दखल घेत जनावरांच्या लम्पी आजाराची संसर्गकेंद्रे माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडून घोषित करण्यात आली होती.त्याबाबत सजग रहाण्याच्या सुचना जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजित राऊत साहेबांनी दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने जळगाव, चाळीसगाव तालुक्यातील मौजे वाकडी, पाचोरा तालुक्यातील नांद्रा, पिंपरखेड, वरखेड, भडगाव तालुक्यातील पिर्चेडे या ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी या त्वचेच्या साथ रोगाचा निष्कर्ष होकारार्थी आला असल्याने या रोगाचा प्रसार जिल्ह्यात होण्याची भिती असल्या कारणाने दक्षतेचा उपाय म्हणून व
आजाराची लागण होऊ नये म्हणून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यातील या चार संसर्गकेंद्रापासून १० कि.मी बाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी मा.श्री.अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले होते.
म्हणून लम्पी या त्वचेच्या आजाराच्या संसर्गाच्या अनुषंगाने बाधित क्षेत्रातील जनावरांचे शेड निर्जतुकीकरण करुन १० कि.मी परिघातील परिसरात जनावरांची खरेदी-विक्री, वाहतुक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यासही कडक प्रतिबंध घालण्यात आले होते.
परंतु आता लम्पी स्क्रीन आजाराचा प्रादुर्भाव जाणवत नसल्याने पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे दर गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार दिनांक २१ गुरुवार २०२१ पासून नियमितपणे सुरु करण्यासाठीचे तोंडी आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी दिले असून लवकरच लेखी स्वरूपात आदेश प्राप्त होणार असल्याने उद्यापासून वरखेडी येथील बैल बाजार पुर्ववत सुरु करण्यात आला असल्याचे पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांनी सत्यजीत न्यूजला कळवले आहे.