कमी खर्चात व शेतजमिनीची पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा, संजय पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०३/२०२२
शेती व्यवसाय करतांना आजच्या धावपळीच्या युगात जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. परंतु हे करतांना शेतकरीवर्ग जास्तीत जास्त महागड्या रासायनिक खतांचा वापर करत असल्याने शेतकरी बांधवांचा पैसा तर खर्च होतोच सोबतच सततच्या रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची पोत खालावत जाते. म्हणून शेतकरी बांधवांनी जास्तीत सेंद्रिय खतांचा वापर करावा म्हणजे शेतकऱ्यांचा पैसा वाचेल व शेतजमिनीची पोत टिकून राहील, पिकांवर रोगराई कमी पडते व फवारणीचा खर्च वाचतो तसेच सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेले धान्य आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे मत पाचोरा येथील जनसेवा एजन्सी, सेंट्रल मॉल संजय बळीराम पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच सेंद्रिय खताबाबत सविस्तर माहिती दिली. यात इन्फ्लक्स आग्रोटेक पुणे या कंपनीचे
१) सॉईल लाईफ _ सॉईल लाईफ सॉल्ट मटेरियल विरघळते आणि सॉल्ट मटेरियल विरघळले तर जमीन भुसभुशीत होते, जमीन भुसभुशीत झाली की पांढऱे मूळ प्रचंड फुटतील, पांढरे मूळ फुटले की अन्नद्रव्यांची उचल होऊन झाडे मजबूत होतील तसेच शेनखत, रासायनिकखत याचे फास्ट विघटन होईल बॅक्टरिया दुप्पट होऊन जमीनची सुपीकता वाढते.
१) सुपरक्रॉपचा वापर केल्याने उत्पादनात ३० ते ४० टक्के वाढ होते रासायनिक खत ५० टक्के कमी करून, उत्पादन वाढून जमिनीची सुपीकता वाढवते.
३) भुअस्त्रा वापरल्याने जमिनीतील बुर्शी नष्ट होऊन पीक जोमदार वाढते आणि उत्पादनात फरक पडतो.
४) अल्लरौंडर हे कुठल्याही स्प्रे मध्ये १० मिली टाकून फवारणी केल्यास तुमच्या ३० टक्के औषधीची बचत होऊन औषधी पॉवरफुल बनवते. तसेच वारंवार फवारणीची गरज भासणार नाही. हे फायदे आहेत. याचे सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहे, स्प्रेडर, शाईनर.
५) मिल्क लाईफ याचा (जनावरांकरिता) आहारात वापर केल्यास दूध, फॅट वाढून चारा पाणी कमी लागेल, जनावर तंदरुस्त होऊन प्रतिकारशक्ती वाढल्याने त्यांचा अनेक आजारांपासून बचाव होऊन दवाखान्यात लागणाऱ्या खर्चाची बचत होईल. अशी माहिती पाचोरा येथील संजय बळीराम पाटील. जनसेवा एजन्सी सेंट्रल मॉल यांनी दिली असून अधिक माहिती व प्रोडक्ट मिळवण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९७०१९०१२९ यावर संपर्क साधवा अशी विनंती केली आहे.