डॉ. प्रशांत पाटील. यांनी केल्या मार्गदर्शक सूचना.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०५/२०२१
सद्यस्थितीत सर्वदूर चोवीस तास एकच शब्द कानावर पडतो तो म्हणजे कोरोना कारणही तसच आहे. कोरोनाची लागण ही अदृश्य स्वरूपात कधीही कुठेही होऊ शकते. कारण हा आजार संसर्गजन्य आहे. हा आजार घातक असलातरी कोरोनाबाधीत रुग्णाने योग्यवेळी, योग्यप्रकारे उपचार करुन पथ्य पाळल्यास कोरोनाबाधीत रुग्ण शंभर टक्के बरा होऊ शकतो परंतु त्याकरिता काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. असे मत पाचोरा येथील सुधन हॉस्पिटलचे डॉक्टर मा.श्री. प्रशांत पाटील. यांनी व्यक्त केले.
याबाबत बोलतांना डॉ. प्रशांत पाटील यांनी त्यांचे काही अनुभव सांगत कोरोनाची लागण होऊनये म्हणून दैनंदिन जीवनात काय काळजी घेतली पाहिजे हे सांगितले तसेच दुर्दैवाने कदाचित कोणालाही कोरोनाची लागण झालीच तर घाबरून न जाता योग्यवेळी, योग्यप्रकारे उपचार घेऊन पथ्य पळल्यास हा आजार शंभर टक्के बरा होऊ शकतो असे सांगितले.
तसेच आजतरी कोरोना आजारा विषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. कारण आजारापेक्षा जनतेच्या मनात भिती जास्त असल्याचे जाणवते व या भितीपोटी बरेचसे रुग्ण आपली मानसिकता खराब करून घेतात मग औषधोपचार करतांना डॉक्टरांना अडचणीचे जाते. यातच रुग्णाची मनस्थिती खराब होत जाते. इच्छाशक्ती बळकट असली तर सगळ्या संकटातून बाहेर निघता येते. असे सांगत पिंपळगाव हरेश्वर येथील वयोवृद्ध मा.श्री. गिते सरांचे उदाहरण समोर ठेवले.