मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी रुपयांचा निधी मंजूर. आमदार किशोर आप्पा पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०३/२०२१
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा, खाजोळा सार्वे बु. तालुका हद्द सा.क्र. २२/८६० टी. आर. ०९ येथील पुलाचे निर्माणासाठीचा प्रस्ताव मा. श्री . किशोर आप्पा पाटील आमदार पाचोरा यांनी मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे सादर करून पुलाच्या निर्माणासाठी गरज लक्षात आणून दिली. चर्चा गांभीर्यांने घडवून आणली झालेल्या चर्चेची त तातडीने दखल घेऊन मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब यांनी २ कोटी रुपये निधीस मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. प्रशासकीय मान्यता देखील प्राप्त झालेली आहे.
सदर विकासकामांना भरीव निधी उपलब्ध करून देणेकामी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.ना. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी केलेल्या आदेशानव्ये तथा मा.ना. श्री. गुलाबरावजी पाटील पालकमंत्री जळगाव मा.ना. श्री. अब्दुल सत्तार साहेब ग्रामविकास राज्यमंत्री यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे मुख्यमंत्री महोदय तथा पालकमंत्री शतशः आभार विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे जनता जनार्दन देखील आनंद व्यक्त करीत आहे.