पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत बनवलेल्या परसबागेचे उदघाटन संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/०७/२०२१
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनचे आवारात आज दिनांक २२ जुलै २०२१ शुक्रवारी रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत माझी पोषण परसबाग या मोहिमे अंतर्गत तयार करण्यात आलेल्या मॉडर्न परसबागेचे उद्घाटन कार्यक्रामाच्या अध्यक्षा श्रीमती निताजी कायटे यांच्या उपस्थितीत व जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्या माननीय रत्नप्रभा अशोक पाटील. पिंपळगाव हरेश्वरच्या माननीय सरपंच सौ. सुमन सुभाष सावळे,उपसरपंच मा.श्री. गीते सर,तंटामुक्ती अध्यक्ष, पिंपळगाव हरेश्वर व शिंदाड गटातील उमेद अभियानाच्या सर्व केडर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री. मधुकर भाऊ काटे यांनी उपस्थित असलेले सर्व उमेद अभियानाचे कॅडर व महिलांना मोलाचे सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शना मध्ये ज्या काही अडचणी महिलांना कामासंबंधी येत असतील तर आपल्या मदतीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच पंचायत समितीच्या सदस्य व जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी कायम आपल्या मदतीसाठी तयार आहे. तरी जी काही अडचण असेल ती आमच्या माध्यमातून जे काही शक्य असेल ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार तसेच जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये अजून चांगले बचत गटांची स्थापना करून वंचित व गरीब कुटुंबांना मदत करावी आणि असे परसबाग ह्या प्रत्येक बचत गटाच्या सदस्यांनी तयार करून त्यांना योग्य सेंद्रिय भाजीपाला रोजच्या रोज उपलब्ध होईल असं कार्य प्रत्येकाने करावे. तसेच माननीय श्रीमती नीताजी मॅडम ए.पी.आय. यांनी सदर उमेद अभियानाचे काम व महिलांचे संघटन अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याच असल्याचे सांगत निताजी कायटे यांचे कौतुक आपल्या भाषणातून व्यक्त केले.
तसेच महिलांचे हक्क व अधिकार बाबत उपस्थित कॅडर व महिलांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शरद पाटील सर यांनी व प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती पाचोरा श्री.रवींद्र सूर्यवंशी यांनी केले.
सदर प्रास्ताविकामध्ये रवींद्र सुर्यवंशी यांनी उमेद अभियानाचे कार्य कशा पद्धतीने चालते तसेच वंचित, गरीब, एकल महिला, विधवा महिला परितक्त्या महिला यांच्यासाठी कशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कामकाज चालते हे उपस्थितांना सविस्तरपणे सांगितले. तसेच परसबाग याविषयी पाचोरा तालुक्यात साडेसहाशे परसबागा माझी पोषण परसबाग या मोहिमेत करण्यात आलेले आहेत. पिंपळगाव हरेश्वर येथे एकूण बचत गटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत तीन सामूहिक व ४३ वैयक्तिक परस बागां या तयार करण्यात आलेल्या आहेत. याचे महत्त्व कुटुंबाला रोजच्या रोज सेंद्रिय पद्धतीने व विना रासायनिक फवारणी चा भाजीपाला मिळावा व कुटुंबाची युमिनीटी पावर वाढण्यासाठी परिपूर्ण जीवनसत्व आपल्या रोजच्या आहारामध्ये मिळावा यासाठी परस बागांचे महत्व पटवून सांगितले. तसेच आरोग्यावर कुटुंबांचा होणारा खर्च हा कसा कमी होऊ शकतो व कुटुंब निरोगी कशा पद्धतीने राहू शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संदीप खेडकर तालुका व्यवस्थापक व श्री. शरद पाटील प्रभाग समन्वयक श्री. लखन वाघमारे प्रभाग समन्वयक श्री. हर्षल सोनवणे प्रभाग समन्वयक यांनी आणि सीटीसी श्रीमती योगिता थोरात तसेच सर्व सीआरपी बँक सखी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी करून दाखवला.