सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२१
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जळगाव, जिल्हा महिला शिक्षक संघटना जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. ३ जानेवारी २०२१ रोजी सावित्रीबाई फुले महिला शिक्षक दिनाच्या निमित्ताने हे पुरस्कार देण्यात येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीन महिला शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यात आपल्या श्री.गो.से.हायस्कूलमधील उपशिक्षिका श्रीमती *सुखदा पाटील मॅडम* यांना माध्यमिक व आश्रमशाळा गटातून उपक्रमशील शिक्षिका म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदामंत्री जयंत पाटील-यांच्या शुभहस्ते बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहेत.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप ओंकार वाघ,चेअरमन नानासो संजय ओंकार वाघ,
मानद सचिव दादासो ॲड महेश देशमुख,
व्हाईस चेअरमन नानासो व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन आण्णासो वासुदेव महाजन,सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंदातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!