वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांचे ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनला साकडे
दिलीप जैन.(पाचोरा)
पाचोरा तालुक्यातील वडगाव अंबे गावात गावठी डुकरे व मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून जेष्ट नागरिक , महिला व मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या बाबतीत सविस्तर वृत्त असे की वडगाव अंबे गावात शेंदूर्णी येथील अंबादास जाधव या इसमाने त्यांच्या मालकीची डुकरे सोडलेली आहेत.परंतु गावात डुकराची संख्या मोठ्या प्रमाणात झाली असल्याने ग्रामस्थांना खुपच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वडगाव अंबे हे गाव हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करत असून गावात वैयक्तिक सौचालयाचा वापर वाढला आहे. तसेच गावातील सांडपाण्याच्या गटारी ह्या भूमीगत झाल्या असल्याने या गावठी डुकरांना खाद्य मिळत नाही तसेच वडगाव अंबे या गावात शेतकरीवर्ग असल्याने शेतकरी शेतात गेल्यावर ही डुकरे दरवाज्याला धडक मारुन थेट घरात घुसून घरातील अन्नधान्याची नासाडी करता.तसेच या दिवसात कापूस,तुर,चवळी,मुग,धान्य घरासमोर वाळत घातल्यास ही डुकरे यावर ताव मारतात म्हणून शेतीमाल वाळवतांना खुपच दक्षता घ्यावी लागते,तसेच लहान मुले दुकानातून किराणा सामान घेऊन येतांना डुकरे अंगावर धाऊन जातात.तसेच गावाजवळील शेतात जाऊन शेतीमालाचे नुकसान करतात.
यातच भरीतभर म्हणजे गावठी कुत्र्यांची संख्या वाढली असून या कुत्र्यांना खाद्य मिळत नसल्याने हे डुकरांचा फडशा पाडून ती खातात या प्रकाराने डुकरांना रक्ताची चटक लागल्याने ही कुत्री लहान बालके व प्रोढव्यक्तीवर हल्ला चढवून चावा घेतात.
या डुकरांचा व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार प्रयत्न केले पोलीस स्टेशनला डुकरांच्या मालकाविरूध्द अर्ज व ठराव देऊन डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी केली. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी वारंवार संबधीतास बोलावून तोंडी समज दिल्यावरही आंबादास जाधव काहीएक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसून उलट तक्रारदार ग्रामस्थांना दमदाटी करून घाबरवण्याचा प्रयत्न करतो
तरी संबंधित डुकराच्या मालकावर त्वरित कडक कारवाई करून गावातील डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वडगाव अंबे ग्रामस्थांनी केली आहे.
येत्या आठदिवसात यांचा बंदोबस्त न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाचा पावित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.