जामनेर व पाचोरा तालुक्यात अजूनही वृक्षतोड सुरुच. वनविभाग अस्तित्वात आहे की नाही ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०६/२०२१
मागील तीन महिन्यांपासून जामनेर व पाचोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्वयंचलित मशीनच्या साह्याने दिवसाढवळ्या वृक्षांची कत्तल सुरुच आहे. याबाबत वारंवार आवाज उठवून सुध्दा वनविभागाने अद्यापपर्यंत एकही कारवाई केलेली नसल्याचे समजते.
यामागचे एकमेव कारण म्हणजे लाकुड व्यापारी व वनविभागाचे साटेलोटे परंतु झपाटय़ाने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे मोठ्याप्रमाणात निसर्ग संपत्ती नष्ट होत आहे. तरी अवैधरीत्या होणारी वृक्षतोड थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
ब्रेकिंग न्यूज~ वनविभागाचे एका हितचिंतकांने दिलेली माहिती अशी की वनविभागाच्या एका कर्मचाऱ्यांने लाखोची नव्हे तर कोटींची कमाई करुन नंदुरबार तालुक्यात आपल्या राहत्या गावी अंदाजे एक कोटी रुपये खर्चून बंगला बांधला असून अजून बंगल्याचे बांधकाम सुरु असल्याचे समजते तसेच या तालुक्यात चांगली कमाई होत असल्याने कार्यकाळ संपला असल्यावरही संबधीत कर्मचाऱ्यांची बदली का होत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
(अश्या कर्मचारी वर्गाची चौकशी होऊन कारवाई व्हावी हि अपेक्षा)