परस्पर बँकेतील पैसे काढणाऱ्या पती विरोधात एम.आय.डी.सी.जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/११/२०२१
पाचोरा तालुक्यातील वडगाव जोगे येथील माहेर व रामदेव वाडी येथील सासर असलेली विवाहिता सौ. प्रतिभा भोजू राठोड हिचे रामदेव वाडी येथील भोजू बद्री राठोड याच्याशी हिंदू विवाह पध्दतीने सन ०८/०५/२०११ मध्ये विवाह झाला असून सुरवातीला त्यांचा संसार सुखाने सुरु होता. परंतु काही महिन्यातच सौ. प्रतिभा राठोड हिचा पती तीला मारठोक करुन मानसिक व शारीरिक छळ करु लागल्याने सौ.प्रतिभा राठोड यांना होणारा छळ सहन न झाल्यामुळे सद्यस्थितीत त्या १९/०३/२०२० पासून वडगाव जोगे येथे माहेरी रहात आहेत. तसेच सौ.प्रतिभा राठोड हिने पती व सासरच्या मंडळी विरुध्द पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दिनांक ०६/०५/२०२१ रोजी तक्रार दाखल केली असून ४९८ (ए), ३२३,५०४,३४ प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सौ.प्रतिभा राठोड हिचे पति भोजू राठोड यांनी घटस्फोट घेण्यासाठी जळगाव न्यायालयात दावा दाखल केला असल्याचे सौ.प्रतिभा राठोड यांनी सांगितले.
परंतु याच कालावधीत सौ. प्रतिभा राठोड ह्या वडगाव जोगे येथे माहेरी रहात असतांनाच आर्थिक चणचण जाणवू लागल्याने दिनांक ११/०५/२०२१ रोजी सौ.प्रतिभा राठोड पैसे काढण्यासाठी शिरसोली येथील महावीर सहकारी बँकेच्या शाखेत गेल्यानंतर खात्यावर पैसे नसल्याचे दिसून आले. याबाबत बँकेत चौकशी केली असता सौ.प्रतिभा राठोड हिच्या नावे असलेल्या खाते क्रमांक ००५११११००००८४३८ शिरसोली येथील महावीर सहकारी बँक शाखा शिरसोली बँकेतुन सौ.प्रतिभा राठोड हजर नसतांना बेकायदा संगनमत करुन दिनांक २४/०४/२०२० रोजी २२८००/०० रुपये, दिनांक ०८/०६/२०२० रोजी ९९००/०० रुपये व इतर बेकायदा व्यवहाराने ६२,०००/०० रुपया पर्यंतची रक्कम संमती नसतांना व सौ.प्रतिभा राठोड ह्या हजर नसतांना खोटे दस्तऐवज तयार करून कुणीतरी काढून घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
म्हणून हे पैसे शिरसोली येथील महावीर सहकारी बँकेचे व्यवस्थापक व माझे पती भोजू राठोड यांनीच काढले असल्याचे विवाहितेचे म्हणने असून सदर विवाहितेने एम.आय.डी.सी. जळगाव पोलीस स्टेशनमध्ये दिनांक ०७/०८/२०२१ रोजी रीतसर तक्रार दाखल केली असून याबाबत एम.आय.डी.सी.पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मा.श्री. राजेंद्र उगले करीत आहेत.