सार्वे बुद्रुक (प्र.लो.) शिवारात अवैध उत्खनन चौकशी होऊन दंडात्मक कारवाई व्हावी सरपंच व सदस्यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/०५/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या सार्वे बुद्रुक (प्र.लो.) ग्रामपंचायतीचे हद्दीतील जामने शिवारात मागील काही वर्षापासून गायरान व इतर खाजगी जमीनीवर अवैधरीत्या खोदकाम करुन त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात खडी, मुरुम वाहून नेत असल्याचा प्रकार सुरु होता व आजही उत्खनन सुरुच आहे.
हे अवैध उत्खनन थांबवण्यासाठी व पुढील कारवाई कामी सार्वे बुद्रुक (प्र.लो.) ग्रामपंचायतीचे सरपंच्या सरपंच सौ.भागाबाई बळीराम पाटील, उपसरपंच श्री. गजानन भानुदास पाटील व सदस्यांनी एक दक्षता समिती स्थापन करुन तहसीलदार कार्यालय पाचोरा कार्यालयात दिनांक ३० एप्रिल २०२१ रोजी माहितीचा अधिकार टाकून जामने शिवारत सुरु असलेल्या अवैध उत्खनन व खडी खदान बाबतीत माहिती मागीतली होती. तसेच सार्वे बुद्रुक येथील ग्राम दक्षता समितीने पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दिनांक २१ मे २०२१ रोजी निवेदन देऊन सार्वे, जामने शिवारात होत असलेल्या गौण खनिजा बाबत चौकशी करुन कारवाईची मागणी केली होती.
याची दखल घेत मा.तहसीलदार पाचोरा यांनी सौ.निलम बेलदार तलाठी यांना आदेश देत स्थळ पहाण्यासाठी पाठवले होते. त्यानुसार दिनांक २१ मे २०२१ रोजी तलाठी यांनी सार्वे बुद्रुक येथे येऊन ग्रामपंचायतीत बैठक घेऊन सरपंच व दक्षता समितीचे म्हणणे ऐकून घेत गौण खनिजाचे अवैध उत्खनन, साठा व वाहतूकीच्या तक्रारी जाणून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले.
नंतर जामने शिवारात येऊन उत्खनन होत असलेल्या स्थळावर भेट देऊन स्थळ पहाणी केली असता जामने शिवारात गट नंबर मौजे जामने शिवारातील गट नंबर २७/१/२ या गुरचरण गटामध्ये क्षेत्र ११.२७ हेक्टर आर मध्ये मोठ्या प्रमाणात दगडाचे, तसेच मुरमाचे उत्खनन होत असल्याचे आढळून आले.
तसेच गट नंबर २७ च्या पोटहिस्यामध्ये मुरुम व दगडाचे उत्खनन केल्याचे दिसून आले असे नमूद करत
साधारणपणे अंदाजे एक हजार ते पंधराशे ब्रास मुरमाचा साठा तसेच अंदाजे पंधराशे ब्रास दगडाचा साठा दिसून येत असल्याचे नमूद करत, पाचोरा ते जामनेर रस्त्यालगत पन्नास फुटाच्या आतमध्ये उत्खनन चालु असल्याचे आढळून आले. या उत्खननामुळे याठिकाणी अंदाजे ३० ते ४० फुट खोल व एक हजार फुट लांबी, रुंदीचे मोठमोठे खड्डे दिसून आले असल्याने वरील प्रमाणे स्थळनिरिक्षन करून अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करुन वरिष्ठ कार्यालयाने आपल्या स्तरावरून सदर जागेचा पंचनामा करून योग्य ती कारवाई करावी असा अहवाल सार्वे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच व दक्षता समितीला दिला असल्याने आता या अवैधरीत्या सुरु असलेल्या गौण खनिज प्रकरणास कोण जबाबदार आहे. कोणाकोणावर कारवाई होणार याकडे पंचक्रोशीतील जनतेतून उत्सूकता लागली असून या होत असलेल्या उत्खननाबाबत सखोल चौकशी होऊन उत्खनन न थांबल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच, उपसरपंच, सदस्य व दक्षता समितीने दिला आहे.