नेरी येथे नवीन अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/३०२१
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या नेरी येथे जिल्हापरिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हापरिषद गटनेते मा. श्री.रावसाहेब (जिभाऊ) पाटील यांच्या प्रयत्नातून अंगणवाडी शाळेसाठी ८ लक्ष ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून आज त्यांच्याच शुभहस्ते श्रीफळ वाढवून नवीन अंगणवाडी बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले.
नेरी येथे नवीन अंगणवाडी बांधण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी रावसाहेब पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यामुळे मा.श्री.आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब (जिभाऊ)पाटील यांनी त्यासंबंधी पाठपुरावा करून अंगणवाडी साठी ८ लक्ष ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून नवीन अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन आज रोजी त्यांच्या शुभहस्ते पार पडले. त्यावेळी शाखा अभियंता वाडिले साहेब,बोरसे साहेब,नेरी येथील सरपंच, उपसरपंच,ग्रा.प.सदस्य,ग्रामसेवक,मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.