छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुप तर्फे मोफत रक्तदान शिबिर संपन्न.
प्रज्वल चव्हाण.(गोंदेगाव ता.सोयगाव.)
सोयगाव तालुक्यातील पोहरी येथे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुप युवा फाउंडेशन तर्फे मोफत रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सोळा ते पंचवीस वयोगटातील युवकांनी रक्तदान केले.
या शिबिरात गोंदेगाव,वनगाव,घोरकुंड,निंभोरा या गावातून युवा नेते रक्तदान देण्यासाठी आले होते आयर्न फाउंडेशन तर्फे तालुक्यात कुठेही रक्ताची गरज भासल्यास आपन त्या व्यक्तीला तात्काळ मदत करून देऊ शकतो या हेतुने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आर्यन ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष आर्यन भाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यक्रम राबविण्यात येतात .त्यातला एक भाग म्हणून रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर घेऊन गरजूंना मदत करण्यात येते.
आर्यन गुरु हा युवकांचा ग्रुप असून या ग्रुपमार्फत युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे, व्यायामाचे महत्त्व पटवून देत, सोबतच समाजप्रबोधन करुन गावात जातिय सलोखा राखून शांतता सुव्यवस्था ठेवणे इत्यादी उपक्रम या ग्रुपच्या माध्यमातून राबवले जातात. या प्रसंगी पोहरी येथील माजी सरपंच निलेश मगर व ग्रामपंचायत सदस्य ,संघर्ष ग्रुप चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ उपस्थित होते.