बिलवाडी ,ता.जामनेर येथील चर्मकार समाजातील मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०६/२०२१
जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथील चर्मकार समाजातील मतिमंद अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.सदर मुलीवर हा अत्याचार अनेक दिवसांपासून घडत होता,तरी जिवितास धोका असल्यामुळे तिने या प्रकरणाची वाच्यता केली नाही,सदर मुलगी आपल्या मोठ्या बहिणीकडे उल्हासनगर(कल्याण) येथे आईसोबत १जून रोजी गेली असता,तिच्या पोटात अनेक दिवसांपासूनचे दुखणे वाढले.त्यामुळे खाजगी रुग्णालयात तपासले असता,सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला गेला.नंतर सदर मुलीच्या पोटात गर्भ वाढत असल्याचे समोर येताच उल्हासनगर ३ च्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता.तेथे मुलीला विश्वासात घेऊन सर्वप्रकार सांगावयास लावले असता गावातीलच काही मुले तिच्यासोबत सदर अत्याचार करित असल्याचे कळले. कल्याणहुनच सदर प्रकरणी गुन्हा नोंदवून शून्य क्रमांकाने गुन्हा पहूर पोलिस ठाणे येथे(गुन्हा रजिस्टर नंबर १८८/२०२१ दिनांक ०६/०६/२०२१)वर्ग करण्यात आले. लगेचच मुलीच्या पालकांनी मुलीसह आपल्या बिलवाडी येथे धाव घेतली.
पहुर पोलिसांनी एकूण सहा आरोपींना अटक केली असून त्यात तीन आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते.
सदर प्रकरणात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा,पोस्को,बलात्कार असा कलमाचा समावेश करुन पिडीताचे आणि आरोपींचे (डीएनए) तपासकामी घेण्यात आले असल्याचे कळते.दरम्यान सदर अत्याचार पिडीत मुलीस त्या नराधमांनी वारंवार केलेल्या बलात्कारामुळे गर्भवती झाली होती ,तिचा गर्भपात करण्यासाठी *मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे डब्ल्यू पी ६७६९/२०२१ दाखल करण्यात आली होती सदर याचिकेवर दिनांक २१ जून २०२१ रोजीच्या सुनावणी दरम्यान मे.न्या.एस.व्ही.गंगापूरवाला आणि मे.न्या.एम.जी.सेवलिकर यांच्या खंडपीठाने गर्भपातास परवानगी दिल्याचे कळते.
माणुसकिला काळीमा फासणारी ही घटना,परंतु *जळगाव जिल्ह्यातील कोणतेही राजकीय नेते,पदाधिकारी,तसेच शासनाचे प्रतिनिधी असणारे जिल्ह्याचे पालकमंत्रीही सदर कुटूंबास धीर देण्यासाठी आले नाही,ही खंत आहे.
पुढील तपास हा जिल्हा पोलिस उपअधीक्षक श्री.काकडेसाहेब यांकडे सोपवण्यात आहे आहे.
सदर अत्याचार प्रकरणी चर्मकार समाजाच्या सामाजिक संघटनांनी दिनांक २३जून २०२१,बुधवार रोजी प्रत्यक्ष गावात जावून पिडीत कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वना केली.
सदर प्रकरणी संपूर्ण परिसरातील चर्मकार समाजात व इतर सर्व समाजात संतापाची लाट उसळली आहे.
पिडीताच्या गावातील एकमेक असलेल्या घरातील सदस्यांना तात्काळ संरक्षण द्यावे,आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा व्हावी,पिडीताचे शासनातर्फे योग्य पूनर्वसन करण्यात यावे.तात्काळ सदर कुटुंबास आर्थिक मदत द्यावी यासह इतर मागण्यांचे निवेदन पहुर पोलिस स्टेशनला देण्यात आहे आहे
सदर प्रसंगी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.