नगरदेवळा येथील जितेंद्र परदेशी यांचा उत्कृष्ट गुणवंत अधिकारी म्हणून गौरव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२१
नगरदेवळा येथील जितेंद्र परदेशी यांचा मुंबई महापालिकेच्या वतीने ‘माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रभाग समिती गौरव पुरस्कार २०१९’ वितरण समारंभ महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयातील सभागृहात नुकताच पार पडला. त्यावेळी परदेशी यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व धनादेश स्वरूपात रक्कम प्रदान करण्यात आली. दरम्यान परदेशी यांना पुरस्कार स्वरूपात मिळालेली रक्कम महापौर निधीमध्ये देणगी स्वरूपात देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
जितेंद्र विठ्ठलसिंग परदेशी हे नगरदेवळा येथील मूळचे रहिवासी असून ते सरदार एस के पवार विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठलसिंग परदेशी यांचे चिरंजीव आहेत. ते सध्या मुबंई येथे उद्यान अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची महाराष्ट्र्रात ओळख आहे. त्यांच्या या गौरवाचे त्यांच्या मित्रपरिवाराने, ग्रामस्थांनी व क्षत्रीय परदेशी समाजाने अभिनंदन केले आहे.