कॉग्रेस सोशल मीडियाचे राहुल शिंदे यांनी सापडलेला मोबाइल केला परत.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०७/२०२१
अॉनलाईन अभ्यास करणार्या मध्यमवर्गीय विद्यार्थ्याचा हरवलेला मोबाईल कॉंग्रेस सोशल सोशल मिडिया विधानसभा अध्यक्ष मा.श्री. राहुल शिंदे यांना सापडला होता.तो मोबाईल त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांचेकडे जमा केला होता.
कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या कडे मोबाईल जमा केल्यावर लगेचच त्यांनी संबधित मोबाईल सापडल्याचे सोशल मिडियाव्दारे संदेश टाकून ओळख पटवून मोबाईल घेऊन जाण्यासाठी अवाहन केले होते. सदरील संदेश पाहून नवकार प्लाझा जवळील साई पार्क परिसरात राहणाऱ्या दिनेश देविदास जाधव याला माहित पडताच आपला मोबाईल काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री. सचिन सोमवंशी यांच्याकडे व्यवस्थित असल्याचे समजताच त्याला खुप आनंद झाला होता.
दिनेश जाधव यांनी नवकार लगेचच सचिन सोमवंशी यांच्या कार्यालयात धाव घेतली व सापडलेला मोबाईल माझाच असल्याचे पटवून दिले. हरवलेला मोबाईल हातात येताच दिनेश जाधव याच्या चेहऱ्यावरील आनंद व भावना त्याच्या परिस्थीतीबद्दल सगळे काही सांगून गेल्या तसेच मोबाईल मिळाला नसता तर माझे शालेय नुकसान खुप झाले असते. पुन्हा मोबाईल घेण्यासारखी परिस्थिती नसल्याने नवीन मोबाईल घेणे शक्यच नव्हते. माझे नशिब बलवत्तर होते म्हणून माझा हरवलेला मोबाईल राहुल दादा शिंदे यांच्यासारख्या समाजसेवकाच्या हाती लागला व तो त्यांनी सतत जनहितार्थ झटणाऱ्या सचिन दादा सोमवंशी यांच्याजवळ जमा केल्यावर मला तो परत मिळाला त्यामुळे मी मा.श्री. राहुल दादा शिंदे व मा.श्री. सचिन दादां यांचे आभार व्यक्त करतो. आणि माझ्या परीने लहानसे बक्षीस देतो असे मोबाईल दिनेश जाधव याने सांगितले मात्र श्री.राहुल शिंदे यांनी बक्षीस घेण्यास देखील नकार दिला यावेळी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, पत्रकार किशोर रायसाकडा आदी उपस्थित होते.