शेंदूर्णी येथील गरुड महाविद्यालय, संविधान दिन उत्साहात साजरा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२१
जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील धी. शेंदूर्णी सेकं. एज्यू.को-ऑप सो. संचलित अ.र.भा.गरुड वरिष्ठ महाविद्यालयात संविधान उद्देशिका वाचन कार्यक्रम महाविद्यालयाच्या वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणी विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संजय भोळे हे होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना रासेयो महिला सहाययक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील यांनी केली व कार्यक्रमाच्या आयोजना मागिल उद्देश समजून सांगितला.
तसेच २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले. उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी शाहिदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले व उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय भोळे यांनी उपस्थितांना
“भारतीय संविधान आणि सामाजिक जबाबदारी ” या विषयावर मार्गदर्शन केले.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनात उपस्थितांना भारतीय संविधानाचे महत्व,भारतीय संविधानाने भारतीयांना दिलेले हक्क आणि अधिकार या बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांना संविधानाप्रति त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे आभार रासेयो सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.ए.एन.जिवरग (विद्यार्थी विकास अधिकारी),प्रा.डॉ.योगिता पी.चौधरी(महिला विद्यार्थी विकास अधिकारी)यांनी परिश्रम घेतले. यात सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारिवृंदांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी असे एकूण १५० विद्यार्थी, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारिवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.