पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत जाहीर, काही ठिकाणी तुझ माझ जमेना खुर्ची वाचुन करमेना.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर आरक्षण पुढील प्रमाणे जाहीर झाले असून आता गावागावात चर्चेला उधाण आले असून या आरक्षण सोडतीमुळे बऱ्याच ग्रामपंचायतीचे गणित बिघडणार असलेतरी ज्यांनी सरपंचपदासाठीची स्वप्नही पाहिली नसतील अश्या निवडून आलेल्या सदस्यांना आरक्षण सोडतीमुळे सरपंचपदी विराजमान केल्याशिवाय पर्याय नसल्याने बऱ्याच ग्रामपंचायतीचा कारभार आता (माझी तंगडी तुझ्या हातात, तुझी तंगडी माझ्या हातात) अश्या परिस्थितीत चालवावा लागणार आहे.
【निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्य व भावी सरपंचांना सत्यजीत न्यूज कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा】
*अनुसूचित जाती ( एस सी) एकूण ७ जागा*
*अनुसूचित जमाती (एस टी) एकूण १० जागा*
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) २७
एकूण राखीव जागांची संख्या ४४
उर्वरित ५६ जागा सर्वसाधारण गटासाठी आहेत.
—————————————–
*अनुसूचित जाती ( एस सी) एकूण ७ जागा*
१९९५ ते २०१५पर्यंत एकूण ३८ गावांना आरक्षणाचा लाभ मिळाला आहे ही गावे वगळून उर्वरित गावातील एस सी लोकसंख्या नुसार असलेल्या गावातून आरक्षण निश्चित
१) नाचनखेडा
२) शिंदाड
३)बदरखे
४)कोल्हे
५) भोरटेक खुर्द
६)गाळण बुद्रुक
७) पिंप्री खुर्द प्र पा
*अनुसूचित जमाती (एस टी)*
या पूर्वी 44 गावांना आरक्षणाचा लाभ
१) साजगाव
२) वडगाव आंबे
३)गाळण खुर्द
४)बांबरुड प्र बो
५) भोजे
६)समनेर
७)निंभोरी बुद्रुक
८)वडगाव कडे
९)सारोळा बुद्रुक
१०)दहिगाव
*नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) २७*
यापूर्वी लाभ मिळालेल्या २७ गावे वगळून
१)पिंप्री बुद्रुक प्र पा
२) चिंचखेडे खुर्द
३)खाजोळे
४)लोहटार
५) कळमसरा
६)भातखंडे खुर्द
७)गोरडखेड बुद्रुक
८)दिघी
९)कुऱ्हाड खुर्द
१०)आसनखडे बुद्रुक
११)माहेजी
१२)वरसाडे प्र पा
१३)अंतुर्ली प्र पा
१४)वेरुळी बुद्रुक
१५) डांभुर्णी
१६)तारखेडा खुर्द
१७)बाळद बुद्रुक
१८)परधाडे
१९)वडगाव खुर्द प्र पा
२०)वाडी
२१)सांगवी
२२)खेडगाव
२३)टाकळी बुद्रुक
२४)टाकळी बुद्रुक
२५)ओझर
२६)लोहारा बुद्रुक
२७)वाणेगाव