दिलीप वाघ उपचारार्थ मुंबईत दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०२/२०२१
पाचोरा, भडगावचे माजी आमदार दिलीप वाघ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रूग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत.
पाचोरा भडगाव मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ यांना कोरोनाची लागण झाल्याचे काल निष्पन्न झाले आहे. या बाबत दिलीप वाघ यांचेशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, दोन – तीन दिवसांपासून अंगदुखी-डोकेदुखी तब्येतीचा त्रास जाणवत होता. सुरुवातीला अँटिबायोटिक औषधी घेतल्या. शनिवार दिनांक २० रोजी डॉक्टर्सच्या सल्ल्याने चाचणी केली असता मला कोरोनाची लागण झाल्याचा वैद्यकीय अहवाल आला आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात जे कोणी नागरिक, पक्ष नेते ,पदाधिकारी, कार्यकर्ते आले असतील त्यांनी आरोग्य तपासण्या कराव्या.
दिलीप वाघ पुढे म्हणाले की, आपण मुंबई येथील जसलोक रुग्णालयात पुढील उपचारार्थ दाखल होत आहे. कोरोना आजाराची जिल्ह्यातील वाढती संख्या पाहता मतदार संघातील जनतेने कोणताही निष्काळजीपणा न करता शासनाच्या नियमांचे पालन करावे.लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. आपल्या सह परिवाराची काळजी घ्यावी. मी लवकरच या आजारावर मात करून जनसेवेसाठी हजर होईल असे आवाहन माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले आहे.