सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाला कढलेली नोटीस वादळवाऱ्यात उडाल्याचा संशय.

  • अंबे वडगाव तांडा नंबर दोन येथील महादेव मंदिरावर बाबांचे पुनरागमन, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर.

  • पिंप्री धरणावर अनाधिकृत ताबा घेऊन माती उचल करणाऱ्यांकडून सक्तीने वसूली.

  • पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीसाठी हरीभाऊ पाटील यांचा आंदोलनाचा इशारा.

  • पाचोरा पीपल्स बॅंकेने मुस्ताक पिंजारी यांना दिला पत्ता ठेवून झब्बू, वडिलोपार्जित घराची परस्पर विक्री.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›जळगावात शहरात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात (अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी घेतली पहिली लस)

जळगावात शहरात कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात (अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी घेतली पहिली लस)

By Satyajeet News
January 16, 2021
455
0
Share:
Post Views: 44
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२१
कोरोना महामारी प्रतिबंधक बहुप्रतीक्षित ‘कोविशील्ड’ लस जळगावात दाखल झाल्यानंतर शनिवारी १६ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्षात देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरु झाली. पहिली लस अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घेतली . प्रथम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, अधिसेवीका कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांनी अनुक्रमे पहिल्या सहामध्ये लस घेतली. त्यामुळे हि लस सुरक्षित असल्याचे सांगत कोणीही लसीबाबत घाबरू नये असा संदेशच आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांनी दिला. आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांनी सर्वात पहिले लस घेण्याची राज्यातील बहुधा पहिलीच वेळ ठरली.
जगभर कोरोना महामारीने ग्रासले आहे. या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटची ‘कोविशील्ड’ हि लस तयार झाली आहे. जिल्ह्यात एकूण २४ हजार ३२० लसी उपलब्ध झाल्या आहेत. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनात पालकमंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य सेवेचे नाशिक मंडळाचे उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, प्रशासकीय अधिकारी डॉ. यु.बी. तासखेडकर, आरएमओ डॉ. विलास जयकर यांनी ऐकला.
संदेश ग्रहण झाल्यावर लसीकरणाच्या ठिकाणी मान्यवर रवाना झाले. रुग्णालयाच्या ओपीडी इमारतीत कक्ष क्रमांक ३०० येथे पालकमंत्री, आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी लसीकरण कक्षाची पाहणी केली. येथे सुरुवातीला आरोग्य यंत्रणेच्या प्रमुखांनी ‘कोविशील्ड’ लस घेतली. अधिपरिचारिका कुमुद जवंजार यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना डाव्या हाताच्या दंडावर पहिली लस टोचून लसीकरण प्रक्रियेला प्रारंभ केला. त्यानंतर अनुक्रमे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, अधिसेवीका कविता नेतकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, उप अधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांनी लस घेतली.
कोरोना लसीविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी भीती आहे. मात्र आरोग्य यंत्रणेचे प्रमुख अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील पहिली लस घेऊन हि भीती दूर करीत आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच हे उदाहरण असावे.
लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. “शावैम” मध्ये एकूण १०० आरोग्य कर्मचाऱ्याच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आलेले होते. याठिकाणी अधिपरिचारिका अर्चना धिमते, जयश्री वानखेडे, कुमुद जवंजार, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, बापू पाटील, संपत मल्हार, स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जळगाव जिल्ह्याचे तरुण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी ...

Next Article

ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनीधी ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorized

    कर्जवसुली प्रतिनिधीच्या तगाद्याला वैतागून, कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या.

    December 31, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे,पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी माजी सैनिंकासह पत्रकारांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

    January 14, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedक्राईम जगत

    पोलीस निरीक्षक किरण शिंदेच्या धडक कारवाईने, महिलांच्या सुखी संसाऱ्याच्या आशा पल्लवीत.

    October 4, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    जळगाव जिल्हयात आज आढळले ९२३ कोरोना बाधित रुग्ण.

    March 18, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedराष्ट्रीय

    पाचोऱ्यात शिवसेना व काँग्रेसतर्फे एकदिवशीय धरणे आंदोलन.

    December 4, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    सावधान कोरोनाचं वाढतं संकट, गृह मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर

    November 25, 2020
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है, पाचोरा तालुक्यात अजूनही खाजगी पंटर सक्रीय.

  • Uncategorized

    काळखेडा सारगाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम, दारू दुकानाची जागा स्पर्धा परीक्षा केंद्राला.प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे लवकरच जाहीर सत्कार.

  • निधन वार्ता

    आमदार किशोर आप्पा पाटील यांना मातृशोक.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज