ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीसाठी उमेदवार व त्यांचे प्रतिनीधी यांना मिळणार ओळखपत्रे व अश्या असणार आहेत नियम व अटी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. सर्व मतदान यंत्र व साहित्य सारोळा रस्त्यावरील श्री समर्थ लॉन्स मध्ये ठेवण्यात आले असून तेथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून
दिनांक १८ रोजी मतमोजणी प्रक्रिया केली जाणार असून या मतमोजणीसाठी उमेदवार अथवा त्यांच्या प्रतिनिधीस मतमोजणी केंद्रात प्रवेशासाठीचे ओळखपत्र आज दिनांक १७ रवीवार रोजी सकाळी १० ते १ या वेळेत तहसील कार्यालयात मतमोजणी अधिकाऱ्यांकडून वाटप केले जाणार आहेत. मतमोजणी केंद्रात उमेदवार अथवा त्यांचा प्रतिनिधी अश्या एकच व्यक्तीस प्रवेश दिला जाणार आहे. ओळखपत्र घेण्यासाठी येतांना आपला एक पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा तरच उमेदवार अथवा प्रतिनिधींना ओळखपत्र दिले जाईल तसेच रविवारी ओळखपत्र घेणे शक्य न झाल्यास त्यांना मतमोजणीच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर ओळख पत्र देण्यात येईल . या वेळी उमेदवार अथवा प्रतिनिधी यापैकी एकालाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याची नोंद उमेदवारांनी घ्यावी असे तहसीलदार कैलास चावडे यांनी कळविले आहे.