पाळधी पोलिस चौकीचे लाचखोर पोलीस नाईकसह होमगार्ड लाचलुचपतच्या जाळ्यात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०६/२०२१
अडीच हजारांची लाच भोवली जळगाव एसीबीच्या कारवाईने जिल्ह्यात खळबळ याबाबत सविस्तर वृत असे की तक्रारदाराविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यातील वॉरंटमध्ये त्यांना मदत करण्यासह दारू विक्रीच्या व्यवसायावर परत कारवाई न करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागणार्या पाळधी औटच्या पोलीस नाईकासह होमगार्डला जळगाव एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दूरक्षेत्राच्या आवारातच लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली.
पोलीस नाईक किरण चंद्रकांत सपकाळे (३७, रा.संत मिराबाई नगर, पिंप्राळा शिवार, जळगा) व होमगार्ड प्रशांत नवल सोनवणे (रा.सोनवद, ता.धरणगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीाचे पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव, निरीक्षक लोधी, एएसआय दिनेशसिंग पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, नाईक जनार्दन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी व बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.